नाशिक : डॉ. भारती पवार यांनी व्ही सी द्वारे नाशिक जिल्ह्यातील चिकनगुनिया, डेंगू व मलेरिया साथीचा आढावा घेतला यावेळी प्रतिबंधात्मक उपाय योजना,प्रत्यक्ष चाचण्यांचे (निदान )नियोजन,किट ची उपलब्धता,उपचार,अहवाल (Reporting) ची माहिती घेतली तसेच या साथीला आळा घालण्यासाठी नागरिकांमध्ये जनजागृती करण्याच्या सूचना डॉ. भारती पवार यांनी यावेळी दिल्या व जिल्ह्यातील रुग्णालयांमध्ये कोणकोणत्या सुविधा चालू असून कोणकोणत्या कमतरता आहेत औषधांची उपलब्धता याची माहिती घेतली व त्यांची पूर्तता करण्यासाठी आदेश दिले. यावेळी जिल्हाधिकारी श्री जलज शर्मा, मनपा आयुक्त नाशिक श्री अशोक करंजकर,मनपा आयुक्त मालेगाव श्री भालचंद्र गोसावी ,CEO श्रीमती असिमा मित्तल, डॉ.कपील आहेर ,डॉ.विवेक खतगावकर, डॉ.सुधाकर मोरे, डॉ.संदीप सूर्यवंशी,डॉ. माधव अहिरे, डॉ.जयश्री आहेर, डॉ.राजेंद्र त्र्यंबके, डॉ.विलास बोडके उपस्थित होते.








