मनमाड (प्रतिनिधी) -शासन मान्यताप्राप्त पोलिस मित्र परिवार समन्वय समिती पोलिस प्रशासन,शासन पोलिस परिवार व सामान्य नागरिक यांच्या न्याय हक्कासाठी सदैव तत्पर असलेल्या समितीवर मनमाडचे भूमीपुत्र सतिष परदेशी यांची २५ ते ३० वर्षांपासून सामाजिक, शैक्षनीक, धार्मिक राजकिय, पत्रकारीता, समाज सेवा अशा विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगीरी बाबत व तसेच भारतीय मानवाधिकार परिषद, आंतरराष्ट्रीय मानवाधिकार न्याय सुरक्षा परिषद, आंतरराष्ट्रीय मानवाधिकार सुरक्षा न्याय आयोग, नागरिक सुरक्षा फोर्स, पोलीस सहायता संघटन, सिविल डिफेन्स भारतीय गौरक्षा वाहिनी, पोलीस मित्र समिती महाराष्ट्र रक्षक ग्रुप पुरोगामी, पत्रकार संघ, आयडियल जनरलिस्ट असोशियन इंटरनॅशनल ग्लोबल फाउंडेशन, मातृछाया फाउंडेशन, क्राईम ब्युरो इन्वेस्टीगेशन सीबीआय ट्रस्ट अशा या सर्व संस्थांमध्ये अनेक वर्षांपासून सतिष परदेशी हे कार्यरत आहेत तसेच सक्षम पोलीस टाइम्स उपसंपादक व आवाज महाराष्ट्र एस पी न्यूज व पोर्टल मुख्य संपादक म्हणून कार्यरत आहे.महत्वाची बाब म्हणजे कोरोना काळात सर्व राजकीय, शासकीय, शैक्षणिक, सामाजिक यांनी जनतेची सेवा व कोरोना महामारी मध्ये उत्कृष्ट कामगिरी बजावलेल्या ५०० ते ७०० शासकीय सेवेत महिला व पुरुष कर्मचाऱ्यांना कोविड योध्दा प्रमाणात देऊन सन्मानित केले. लाॅकडाऊनच्या काळात गरीब व भुकेलेल्या जनतेस ११महिने आवघ्या दहा रुपयात दोन वडा दोन पाव जय महाराष्ट्र वडापाव सेंटरच्या माध्यमातून कोविड काळात गरीब जनतेची भूक भागवून आनोखा उपक्रम राबवण्यात आला. याच काळात जिवाची पर्वा न करता प्रिंट मिडिया व इलेक्ट्रॉनिक मिडियासाठी बातम्या पुरविण्याचे कार्य केले त्या बद्दल उत्कृष्ट पत्रकार म्हणून राज्यस्तरीय जिल्हा स्तरीय पुरस्कार नॅशनल संस्थेतर्फे माजी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या हस्ते सतिष परदेशी यांना पुरस्कार देण्यात आला. तसेच डी. आय.जी.आदरणीय प्रतापरावजी दिघावकर यांच्या हस्ते जिल्हास्तरी कोविड योध्दा उत्कृष्ट पत्रकार म्हणून प्रमाण पत्र व पुरस्कार मिळवले आहेत. अशा अनेक कार्याची दखल घेत समितीचे संस्थापक अध्यक्ष डॉ.संघपाल शं. उमरे यांच्या आदेशानुसार महाराष्ट्र कार्याध्यक्ष सुनील परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली सतिष परदेशी यांची पोलिस मित्र परिवार समन्वय समिती महाराष्ट्र प्रदेश मिडीया प्रमुख पदी नियुक्ती करण्यात आली.या नियुक्तीने सतिष परदेशी यांची सर्व स्तरातून अभिनंदन केले जात आहे…
Home Breaking News सतिश परदेशी यांची पोलिस मिञ परीवार समन्वय समिति महाराष्ट्र प्रदेश मिडीया प्रमुख...








