Home Breaking News शाळा क्र ७१ मध्ये स्वातंत्र्यदिन समारोह उत्साहात

शाळा क्र ७१ मध्ये स्वातंत्र्यदिन समारोह उत्साहात

0

नाशिक : स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवाअंतर्गत “हर घर तिरंगा” उपक्रमात हिंदूहृदयसम्राट मा. बाळासाहेब ठाकरे विद्याप्रबोधिनी मनपा शाळा क्र.७१, रायगड चौक, सिडको शाळेत आज स्वातंत्र्यदिन समारोह मोठ्या उत्साहात संपन्न झाला. मा.नगरसेवकआदरणीय सुधाकरभाऊ बडगुजर व हर्षाताई बडगुजर यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न झाले.परीसरातून ढोलताशांच्या गजरात प्रभातफेरी काढण्यात आली. शालेय परिसराची ट्रायकलर फुग्यांनी आकर्षक सजावट करण्यात आली होती.ध्वजारोहणानंतर शालेय बालसंसदेचा शपथविधी समारंभ मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला. विद्यार्थ्यांनी विविध देशभक्तीपर समूहनृत्ये, मानवी मनोरे यांचे सुंदर सादरीकरण केले.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मुख्याध्यापक बाळासाहेब सातपुते यांच्या मार्गदर्शनाखाली किसन काळे, विनोद मेणे, प्रमिला पवार, शोभा मगर, कविता वडघुले, सुवर्णा थोरात, किर्तीमाला भोळे, संध्या जाधव, वर्षा सुंठवाल, सुनिता धांडे, शैलजा भागवत, रुपाली ठोक, योगिता खैरे, प्रविण गायकवाड यांनी परिश्रम घेतले. सूत्रसंचलन विनोद मेणे तर आभारप्रदर्शन किसन काळे यांनी केले. कार्यक्रमास शाळा व्यवस्थापन समिती पदाधिकारी व सदस्य, पालक, जेष्ठ नागरिक संघाचे सदस्य, प्राथमिक व माध्यमिक शाळेचे शिक्षक उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here