नाशिक : सिडकोच्या हिंदूहृदयसम्राट मा. बाळासाहेब ठाकरे विद्याप्रबोधिनी मनपा शाळा क्र. ७१ मध्ये जागतिक आदिवासी दिन व क्रांतीदिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. प्र.मुख्याध्यापक बाळासाहेब सातपुते यांच्या हस्ते प्रतिमापूजन करुन क्रांतीकारकांना विनम्र अभिवादन करण्यात आले. यावेळी वक्तृत्व स्पर्धा, वेशभूषा स्पर्धा, वारली चित्रकला स्पर्धा, आदिवासी नृत्य स्पर्धा घेण्यात आल्या. या स्पर्धांमध्ये इ.१ ली ते ८ वी च्या विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. विशेष म्हणजे शाळेत नुकताच प्रवेश झालेल्या इ.१ ली च्या विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सुंदर आदिवासी नृत्य सादर करुन उपस्थितांची मने जिंकली. विद्यार्थ्यांनी क्रांतीकारका़च्या जीवनावर आपल्या भाषणांतून प्रकाश टाकला. याप्रसंगी शाळेतील जेष्ठ शिक्षिका संध्या जाधव यांचा वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात आला. तदनंतर आपल्या वाढदिवसाचे औचित्य साधून संध्या जाधव मॅडम यांनी उपस्थित सर्व विद्यार्थ्यांना चाॅकलेट वाटून विद्यार्थ्यांचा आनंद द्विगुणित केला.कार्यक्रमाचे नियोजन प्र. मुख्याध्यापक बाळासाहेब सातपुते यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिक्षक किसन काळे, विनोद मेणे, प्रमिला देवरे, शोभा मगर, कविता वडघुले, रुपाली ठोक, योगिता खैरे, सुनिता धांडे, वर्षा सुंठवाल, किर्तीमाला भोळे, सुवर्णा थोरात, शैलजा भागवत, संध्या जाधव, प्रविण गायकवाड यांनी परीश्रम घेतले.









