अहमदनगर : (सुनिल नजन/अहमदनगर) ना.अजित पवार यांनी विरोधी पक्षनेते पदाचा राजिनामा देत चाळीत आमदारांचा पाठिंबा असल्याची वल्गना करीत नऊ मंत्र्यासह उपमुख्यमंत्री पदाची शपत घेतली.परंतू चोवीस तास उलटताच जे आमदार उपमुख्यमंत्री पदाच्या शपथविधी ला हजर होते त्यापैकी काही आमदार आज शरदचंद्रजी पवार यांच्या गाडीत बसून सातारा दौऱ्यावर हजर होते. पक्षाच्या विरोधात भुमिका घेतली म्हणून मा. आमदार शिवाजीराव गर्जे यांना राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी बडतर्फ केल्याची घोषणा करताच खासदार अमोल कोल्हे यांनी कोल्हेकुई करीत आपण शरदचंद्र पवार यांच्यासोबत असल्याचे प्रसार माध्यमांना सांगितले. राष्ट्रवादीचे आमदार मकरंद पाटील, शशिकांत शिंदे, अतुल बेनके यांनी तर थेट राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरदचंद्रजी पवार यांच्या पायावर लोटांगण घालीत आम्ही “साहेब आहे सोबतीला, राष्ट्रवादी पुन्हा”हा नारा देत पुन्हा घरवापसी केली. पक्षविरोधी कारवाया करणाऱ्या अनेक आमदारांना झटका दाखवन्याची तयारी सुरू झाली आहे.त्याचा पहिला झटका शिवाजीराव गर्जे यांना बसला आहे. हीटलीस्टवर असलेल्या अजूनही अनेकांना हा फटका बसणार आहे. त्यामुळे अनेक आमदार शरदचंद्रजी पवार यांच्या महाराष्ट्र दौऱ्यात सामिल झाले आहेत.चोवीस तासातच राष्ट्रवादीचे अनेक बंडोबा थंड व्हायला लागले आहेत. अजूनही बरेच जण घरवापसी ची भुमिका घेणार आहेत. अशी चर्चा महाराष्ट्रात सर्वत्र सुरु झाली आहे. (प्रतिनिधी/सुनिल नजन/अहमदनगर जिल्हा)
Home Breaking News शिवाजीराव गर्जे यांना राष्ट्रवादीतून बडतर्फ करताच ना.अजित पवार यांच्या सोबत गेलेल्या आमदार,...








