कोल्हापूर : केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी कोल्हापूर येथे महालक्ष्मी मातेचे दर्शन घेऊन सर्वांसाठी मंगल कामना केली. मा. पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी जी यांच्या दूरदर्शी नेतृत्वाखाली मोदी सरकारची ९ वर्षे सेवा, सुशासन, आणि गरीब कल्याण योजना महा जनसंपर्क अभियान अंतर्गत मा. खासदार धनंजय महाडिक,महिला अध्यक्ष गायत्री राऊत व कार्यकर्ते यांच्या समवेत विविध मान्यवरांच्या भेटी घेतल्या.यात भाजपा पदाधिकारी व सोशल मिडीया विंग लेखक निलीमा देशपांडे , वृद्धांचा संभाळ करणारे मराठी सिनेअभिनेता स्वप्नील राजशेखर, अनाथ निराधार केंद्र जिथे मोफत उपचार होतात त्या सावली केअर सेंटर चे संचालक किशोर देशपांडे, बालमजुरी मुले-मुली यांना मोफत शिक्षण देणारी अवनी संस्थेच्या अनुराधा भोसले तर महिला बचत गटामार्फत नेतृत्व करणाऱ्या कांचनताई परुळेकर यांची भेट घेतली. यावेळी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
Home Breaking News केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी कोल्हापूर येथे महालक्ष्मी मातेचे दर्शन








