Home Breaking News तरुणांनी विकसित राष्ट्र बनवण्याच्या विचार घेऊन पुढे जावं :- डॉ. भारती पवार

तरुणांनी विकसित राष्ट्र बनवण्याच्या विचार घेऊन पुढे जावं :- डॉ. भारती पवार

0

चांदवड : भारत सरकार च्या क्रिडा मंत्रालया अंतर्गत नेहरू युवा केंद्र, नाशिक यांच्या वतीने घेण्यात आलेला युवा उत्सव – 2023 चा समारोप केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री ना.डॉ.भारती ताई पवार यांच्या अध्यक्षतेखाली तर आ. डॉ. राहुल दादा आहेर यांच्या प्रमुख उपस्थितीत पॉलिटेक्निक महाविद्यालय, चांदवड येथे पार पडला..या युवक उत्सवात नाशिक जिल्ह्यातील 15 ते 29 वयोगटातील युवक कलाकारांकरीता चित्रकला,छायाचित्र स्पर्धा,कविता लेखन,देशभक्तीपर भाषण व सांस्कृतिक कार्यक्रम अशा विविध प्रकारच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमात जिल्ह्यातील युवक युतींनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला या वेळी विजेता स्पर्धकांना पारितोषिक देऊन गौरविण्यात करण्यात आले. तळागळातून ग्रामीण भागातून आलेले युवा वेगवेगळ्या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्या जिल्ह्याचे,राज्याचे नाव देशपातळीवर नक्कीच रोशन करतील.जे स्पर्धक आज विजयी झाले त्यांचे अभिनंदन आहेच मात्र जे हरले त्यांनी खचून न जाता आपण का हरलो ? याचे कारण शोधून जिंकण्याची जिद्द उराशी बाळगल्यास तुमचा विजय नक्कीच होईल यासाठी ध्येयवादी राहण्याचे आवाहन डॉ. भारती पवार यांनी केले.
यावेळी मा.नगराध्यक्ष श्री. भूषण कासलीवाल, भाजपा तालुकाध्यक्ष श्री.मनोज शिंदे, जेष्ठ नेते श्री.अशोक काका व्यवहारे, चांदवड तहसीलदार श्री.मंदार कुलकर्णी, जिल्हा युवा क्रीडा अधिकारी श्री. कमल त्रिपाठी, राष्ट्रीय युवा पुरस्कार विजेते श्री. आरिफ खान, श्री. गाळणकर सर,सचिन निकम, डॉ. विशाल वानखेडे, निलेश काळे, गोरख ढगे,योगेश डोमसे, बाळा पाडवी ,महेश खंदारे, सुनील पंजे,कैलास गुंजाळ आदींसह युवा वर्ग मोठय़ा संख्येने उपस्थित होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here