अहमदनगर : (सुनिल नजन/अहमदनगर जिल्हा) वै. सदगुरु यादवबाबा वाघोलीकर यांच्या क्रुपा आशिर्वादाने ह.भ.प.भाउसाहेब महाराज भालसिंग यांच्या नियोजना खाली १६ ते२८ जून या कालावधीत वाघोली ते पंढरपूर पायी दींडी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.शेवगाव-पाथर्डी विधानसभा मतदार संघाच्या लोकप्रिय आमदार मोनिकाताई राजळे यांच्या हस्ते यादवबाबा मंदिरात महापुजा करून प्रस्थान करण्यात आले.आमदार राजळे यांनी ग्रामस्थां समवेत वाघोली येथे विविध विकास कामाची पाहणी केली.कोपरे येथे भागिनाथ दिंडे, वाघमोडे मंत्री, बळीराम खरात,जगन्नाथ आव्हाड यांनी जोरदार स्वागत केले. हनुमान टाकळी येथे संत जनाबाई महिला मंडळाच्या अध्यक्षा सौ.चंद्रकला व शिवनाथ दगडखैर,बर्डे मेजर बंधू,सुरेंद्र बर्डे, कासार पिंपळगाव येथे नानासाहेब भगत,अरविंद भगत,पत्रकार सुनिल नजन यांनी विरभद्र मंदिरात जोरदार स्वागत केले. तिसगाव येथे राजेंद्र नाथन,प्रकाश आव्हाड,भाउसाहेब ससाणे, अरूण पुंड यांनी स्वागत केले.शिरापुरात आदिनाथ लवांडे यांनी तर व्रुद्धेश्वर येथे लक्ष्मण पुरी यांनी स्वागत करून दींडी कार्यास हातभार लावला. गेल्या ८८ वर्षांपासून या दींडीची परंपरा भालसिंग परीवार, आणि ग्रामस्थ यांनी जपली आहे.व्यवस्थापक म्हणून रमेश दातिर हे दरवर्षी कामकाजात सहभागी होत आहेत.वै.यादवबाबा वाघोलीकर हे एक महान तपस्वी होते. ते दरवर्षी नियमितपणे पंढरपूरला जात असत,तीच परंपरा आजतागायत सुरू आहे.पंढरपूर येथे सातारा चौकातील शिवयोगी मंगल भवन येथे या दींडीचे वास्तव्य राहणार आहे तरी आषाढी एकादशीला पंढरपूरला येणाऱ्या भक्तांनी वरील ठिकाणी संपर्क करावा असे आवाहन यादवबाबा वारकरी विश्वस्त मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.
(प्रतिनिधी सुनिल नजन/अहमदनगर जिल्हा)








