येवला : ना.डॉ.सौ.भारतीताई पवार यांच्या
माध्यमातून जिल्याच्या आरोग्य विकासकामांसाठी आतापर्यंत ४४५
कोटी मंजूर !येवला तालुक्यातील ग्रामीण रुग्णाव प्राथमिक आरोग्य केंद्र यांच्या विकासकामांसाठी २४ कोटी २३ लक्ष रुपयांचा निधी मंजूर नगरसूल आरोग्य केंद्र १४ कोटी ७० लक्ष,अंदरसूल प्राथमिक आरोग्य केंद्र १ कोटी ६१ लक्ष,भारम प्राथमिक आरोग्य केंद्र,३ कोटी ६५ लक्ष,पाटोदा प्राथमिक आरोग्य केंद्र,४ कोटी २७ लक्ष,एक महिना पूर्वीच मंजूर केलेले कामे आहेत.त्या संदर्भात ना. मंत्रीमहोदयांनी वेळोवेळी पाठपुरावा करत ही कामे मंजूर केली आहेत.आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने राष्ट्रीय आरोग्य अभियान मिशन कार्यक्रम अंमलबजावणी योजने अंतर्गत महाराष्ट्रासाठी पुरवणी निधाची तरतूद मंजूर केली आहे. त्यानुसार २०२२-२३ साठी ६५२.१३ कोटी, तर २०२३-२४ साठी एकूण १६१८.५४ कोटी रुपये अशा २२७० कोटींच्या पुरवणी निधीला केंद्र सरकारकडून मंजुरी देण्यात आली आहे. एकट्या नाशिक जिल्ह्यासाठी आतापर्यंत एनएचएम अंतर्गत ४४५ कोटी रुपये मंजूर झाले आहेत.








