Home Breaking News 9 वर्ष सेवा, सुशासन आणि गरीब कल्याणाची:-मा. कैलाश विजयवर्गीय

9 वर्ष सेवा, सुशासन आणि गरीब कल्याणाची:-मा. कैलाश विजयवर्गीय

0

येवला : येवल्यात भाजपचे महा जनसंपर्क अभियानांतर्गत केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री ना.भारती पवार यांनी पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखाली एका क्लिकवर आज देशात डिजिटल क्रांती झाली आहे तसेच मागच्या 70 वर्षाच्या काळात असणारी एम्सची संख्या आणि भाजपच्या केवळ 9 वर्षाच्या कार्यकाळात तयार झालेल्या एम्सची संख्या 23 आहे,गरिबांना चार कोटी घरे व महिला जलशक्ती मंत्रालयाद्वारे 8 कोटी नळकनेक्शन घराघरात पोहचले.अशी एक न अनेक कामे मोदींच्या गतिमान शासनाने केवळ 9 वर्षात करून दाखवली असल्याचे सागितले.युवकांना कलाकौशल्य आत्मसात करून आत्मनिर्भर भारतसाठी योगदान देण्याचे आवाहन केले.स्थानिक पैठणी विणकर उत्कर्षासाठी 1.20 कोटीची अर्थसंकल्पीय तरतूद केली आहे त्याचा फायदा विणकरांनी घ्यावा असे आवाहन केले. भाजपचे राष्ट्रीय महामंत्री कैलास विजयवर्गीय यांनी भाजपच्या ९ वर्षाच्या काळात एक पैशाचाही भ्रष्टाचार झाला नाही आणि सबका साथ सबका विकास हे ध्येय साधण्यासाठी भाजप सरकारने अथक परिश्रम घेत विकास साधला हेच मोठे यश असल्याचे प्रतिपादन केले.आत्मनिर्भर भारत मुळे देशांतर्गत उत्पादने वाढली,त्यामुळे चीन सारख्या देशातून आयात कमी झाली.त्यामुळे जीडीपी दर 7.1 वर पोहचला हि मोदींच्या नेतृत्वाची कमाल आहे. पंतप्रधान आवास योजनेत ४ करोड पैकी १ करोड घरे मुस्लिमांना दिलीत त्यामुळे राम आणि रमजान असा भेद भाजप मनात नसल्याचे सांगून देशाशी एकनिष्ठ तो आपला हाच भाजपचा मंत्र असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी राज्यसभा खासदार विनायक तेंडूलकर(गोवा), माजी मंत्री जयकुमार रावल,भाजप जिल्हाध्यक्ष केदानाना आहेर,जिल्हा संघटन सरचिटणीस सुनील बच्छाव,भाजप महिला मोर्चा जिल्हाध्यक्षा सुवर्णा जगताप,येवला-लासलगाव विधानसभा निवडणूक प्रमुख अमृता पवार,ओबीसी मोर्चा प्रदेश सरचिटणीस शंकरराव वाघ,जिल्हा नेते कैलास सोनावणे,लोकसभा समन्वयक शरद कासार,भाजप जिल्हा उपाध्यक्ष आनंद शिंदे,राजूसिंग परदेशी,दिनेश परदेशी,युवराज पाटोळे, मिननाथ पवार,समीर समदडीया,संतोष काटे,दत्ता सानप,सचिन धकाते,कृष्णा काव्हात, रमेशसिंग परदेशी,निलेश परदेशी, श्रीकांत खंदारे,दत्ता महाले,संतोष नागपुरे,आदर्श बाकळे, मच्छिंद्र पवार,संतोष केंद्रे,संदीप मुरकुटे,पंकज पहिलवान, तरंग गुजराथी,बापू गाडेकर,प्रमोद सस्कर, मनोज दिवटे,धनंजय कुलकर्णी,रमेश भावसार,बाबासाहेब डमाळे यांचेसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here