
मुंबई : वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा श्रदयबाळासाहेब तथा अॅड् प्रकाश आंबेडकर यांचा पत्नी अंजलीताई आंबेडकर ह्या शिर्डी दौऱ्यावर आल्या असता जागतिक महिला दिनानिमित्त येवला तालुका वंचित बहुजन आघाडी चा वतीने शिर्डी शासकीय विश्रामगृह येथे अंजलीताई आंबेडकर तसेच महाराष्ट्र राज्य महिला प्रदेशाध्यक्ष रेखाताई ठाकूर यांचा सत्कार करण्यात आला यावेळी महिला सक्षमीकरण कार्यक्रमांतर्गत महिला चा न्याय हक्कासाठी वंचित चा माध्यमातुन अन्यायाला वाचा फोडा व महिलांना न्याय मिळवून देण्याचे काम करा तरच खरा महिलांचा सन्मान करत जागतिक महिलादिन साजरा केल्याचा आनंद तसेच वर्षातील 365 दिवसांपैकी एकाही दिवशी महिलांचा अनादर होता कामा नये तरच जागतिक महिला दिन साजरा केल्याचे सार्थ ठरेल असे उदगार यावेळी अंजलीताई आंबेडकर यांनी या भेटदरम्यान काढले यावेळी येवला वंचित बहुजन आघाडीचे ज्येष्ठ नेते साहेबराव भालेराव, प्रा. शिवाजी जाधव, प्रभाकर गरुड, युवा नेते दयानंद जाधव ,मुक्तार तांबोळी, शशिकांत जगताप, राम कोळगे यांच्या हस्ते अंजलीताई चा सत्कार करण्यात आला,
