नाशिक : ( प्रशांत गिरासे वासोळ) छावा मराठा युवक संघटनेच्या नाशिक युवक जिल्हा उपाध्यक्षपदी वासोळ(ता.देवळा)येथील सामाजिक कार्यकर्ते मनोज देवरे यांची निवड करण्यात आली.अखिल भारतीय छावा संघटनेचे केंद्रीय अध्यक्ष नानासाहेब जावळे-पाटील याच्या मार्गदर्शनाखाली चांदवड येथे झालेल्या पद वितरण सोहळ्यात देवरे यांना नियुक्ती पत्र देऊन नाशिक युवक जिल्हा उपाध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली.या निवडी प्रसंगी संघटनेचे केंद्रीय कार्याध्यक्ष भीमराव मराठे,महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष पंजाबराव काळे-पाटील,उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष जगदीश जाधव,नाशिक जिल्हाध्यक्ष प्रवीण तनपुरे,नाशिक युवक जिल्हाध्यक्ष जीवन हिरे,मालेगाव तालुकाध्यक्ष किशोर गांगुर्डे आदींची प्रमुख उपस्थिती होती. त्याचबरोबर नाशिक जिल्यातील पदाधिकारी तसेच संघटनेचे कार्यकर्ते उपस्थित होते.देवरे यांच्या निवडीने जिल्हाभरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.