
मुंबई : बदलापूर दि. २ डिसेंबर
जनजागृती सेवा समितीचे संस्थापक तथा पत्रकार श्री गुरुनाथ तिरपणकर यांनी त्यांचा वाढदिवस बदलापूर येथील प्रगती अंध विद्यालयात दिव्यांग मुलांसोबत साजरा केला.या वाढदिवसानिमित्त विद्यालयातील मुलांनी अनेक हिंदी आणि मराठी गीतांनी सुमधुर संगीतमय शुभेच्छा दिल्या आणि उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. त्यांनी गायलेली गाणी आणि वाजवलेली वाद्ये खूप डोळस सकारात्मकता देणारी होती. या वाढदिवसानिमित्त श्री तिरपणकर यांनी या विद्यालयातील मुलांसोबत स्नेहभोजनाचा कार्यक्रम आयोजित केला होता. वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक, राजकीय, पोलीस दल इत्यादी क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
सिटीझन वेल्फेयर असोशीएशन, डॉ. निता पाटील फाऊंडेशन, महानगर विकास कृती समिती इत्यादी सामाजिक संस्थांचे पदाधिकारी यावेळी आवर्जून उपस्थित होते.सर्वांचे जेष्ठ मार्गदर्शक श्री दिलीप नारकर साहेब, राजेंद्र नरसाळे, विलास हंकारे, सुवर्णा इसवलकर, आस्था मांजरेकर आणि त्यांच्या मातोश्री, डॉ.अमितकुमार गोईलकर, डॉ. निता पाटील, विलास साळगांवकर, मंगेश सावंत, श्री प्रफुल्ल थोरात, किशोर गुरव, वैशाली महाजन, मंजू द्विवेदी, प्रसाद टेंबे, श्री विष्णू मिरकुले आणि दिलीप शिरसाठ उपस्थित होते.
श्री तिरपणकर यांनी सपत्नीक उपस्थित राहून सर्वांच्या शुभेच्छांचा स्वीकार केला.
