मुंबई, चेंबूर (प्रतिनिधी-गुरुनाथ तिरपणकर)मुंबई स्कूल स्पोर्ट्स असोसिएशनतर्फे चेंबूर येथील स्वामी विवेकानंद शाळेच्या मैदानावर आयोजित (१४ वर्षांखालील) एमएसएसए फुटबॉल स्पर्धेत साईबाबा पथ मुंबई पब्लिक स्कूल (एज्युको), परेल, च्या संघाने चेंबूरच्या स्वामी विवेकानंद स्कूलचा ८-० असा पराभव केला. ह्या सामन्यातील विजयासाठी प्रमुख प्रशिक्षक चौहान छगन मणिलाल, प्रशिक्षक क्रिश चौहान, क्रीडा शिक्षक योगेश साळवी सर यांनी विशेष मेहनत घेतली असुन साईबाबा पथ शाळेचे विजेते फुटबॉलपटू कृष्णा जाधव, अक्षत पुजारी, दक्ष सावंत, साहिल डेडिया, रुद्र काजरे आदी खेळाडूंनी आपली उत्तम कामगिरी बजावून विजयावर शिक्कामोर्तब केला.