अहमदनगर (सुनिल नजन “चिफब्युरो” अहिल्यानगर जिल्हा प्रतिनिधी ) अहमदनगर जिल्ह्यातील शेवगाव- पाथर्डी विधानसभा मतदारसंघाच्या निवडणूकीतील हॅट्ट्रिक आमदार मोनिकाताई राजळे यांनी दोन्ही तालुक्यातील पत्रकारांचा सन्मान सोहळा पाथर्डी-नगर रस्त्यावरील हाॅटेल मधुबन येथे आयोजित केला होता त्या वेळी आमदार मोनिकाताई राजळे यांनी मी मतदार संघात कधीच जातीपातीच राजकारण केले नाही आणि भविष्यात ही करणार नाही शेवगाव-पाथर्डी तालुक्याने मतदानाद्वारे भरभरुन प्रेम दिले आहे त्याची उतराई होण्यासाठी सदैव प्रयत्न करीन अशी ग्वाही आमदार मोनिकाताई राजळे यांनी दिली.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पाथर्डी बाजार समितीचे सभापती सुभाषराव बर्डे हे होते.यावेळी व्यासपीठावर उमेश मोरगावकर, अविनाश मंत्री,म्रुत्युंजय गर्जे,अभयकाका आव्हाड,नंदकुमार शेळके, जनार्दन लांडे, जनार्दन वांढेकर हे आवर्जून उपस्थित होते. आमदार राजळे पुढे म्हणाल्या की शेवगाव -पाथर्डी तालुक्यातील रस्त्यांची कामे, न्यायालयाची इमारत, पाणीपुरवठा योजना, अशी अनेक ठिकाणी राहिलेली कामे करायची आहेत.पत्रकारांचे कौतुक केले पाहिजे सामांन्य जनतेची कामे जे पत्रकारा पर्यंत येते ते आम्हाला तुमच्या माध्यमातून कळते.निवडून आल्यावर आम्ही विधानसभेत अशी शपथ घेतो की कोणामध्येही दूजाभाव न करता लोकप्रतिनिधी म्हणून काम करण्याची जी शफत घेतली जाते ती तंतोतंत पाळण्याचा प्रयत्न करू.मतदार संघातील कोणत्या गावात किती मतं दिली याचा विचार करून कधीच दुजाभाव करणार नाही असे सांगितले.तसेच एसटी महामंडळाने शेवगाव पाथर्डी आगारासाठी दहा पंधरा नविन बसगाड्या देण्यासाठी पेपरमध्ये आलेल्या बातम्याची कात्रणे दाखवून प्रकाश सरनाईक यांना विनंती करण्यात आली आहे.विधानसभा निवडणूकीत आपण दोन नंबरला राहू असे वाटत होते परंतु शेवगाव करांनी एक नंबर आणि पाथर्डीने ही एक नंबरची मते दिली म्हणून आपल्याला हे यश संपादन करता आले.कुठल्याही क्षेत्रातील व्यक्तींशी आकस न ठेवता काम केले म्हणून ही मताच्या रुपान कामाची पावती मिळाली आहे. शेवगाव -पाथर्डी तालुक्यातील सर्व पत्रकारांना येत्या अधिवेशन काळात अधिवेशनाच्या दुसऱ्या आठवड्यात निश्चितपणे अधिवेशनातील कामकाज पहाण्यासाठी घेऊन जाण्यात येणार आहे.ईच्छुक पत्रकारांनी आपले आधार कार्ड आमदार मोनिकाताई राजळे यांच्या कार्यालयात जमा करावेत. दहा पंधरा पत्रकारांचा ग्रुप तयार करून निश्चित अधिवेशन पाहायला संधी देण्यात येणार आहे असे त्या म्हणाल्या.सर्वच पत्रकारांनी चांगली साथ दिली आहे.काही सुचनाही केलेल्या आहेत.कुठल्याही एखाद्या बातमी बद्दल चांगले किंवा वाईट म्हणण्याचा मला अधिकार नाही असे सांगून पत्रकार हा लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे.पत्रकारांनीही कुठेही एखाद्या बातमीकडे झुकले नाही पाहिजे.जे त्याला वाटेल, जाणवेल त्या लोकांच्या भावना निरपेक्षपणे मांडल्या पाहिजेत.त्या बद्दल पत्रकारा विषयी आकस न धरता पत्रकारा विषयी वाईट नाही बोलले पाहिजे अशी माझी भावना आहे असे आमदार मोनिकाताई राजळे यांनी सांगितले. राजेंद्र सावंत यांना नाशिकमध्ये पुरस्कार मिळाल्याबद्दल आमदार राजळे यांनीही सर्व प्रथम त्यांचा सन्मान केला.जेष्ठ पत्रकार अविनाश मंत्री हे उशिरा आल्याने आमदार मोनिकाताई राजळे यांनी “मंत्री हे आमदार आल्यानंतरच उशिरा येतात “अशी मिश्किली केल्यामुळे सर्वत्र एकच हशा पिकला होता. आमदार मोनिकाताई राजळे यांनी उपस्थित सर्व पत्रकारांना प्रिती भोजनासह ट्रॅव्हल्स बॅगा देउन सन्मानित केले. याप्रसंगी कानिफनाथ पाठक साहेब,रमेश भुसारी, अर्जुन नेहुल, सुरेश बाबर, शंकर जाधव यांनी विशेष मदत आणि सहाय्य केले.
Home Breaking News जातीपातीच राजकारण कधी केले नाही आणि भविष्यात ही करणार नाही,शेवगाव-पाथर्डी तालुक्याने मतदानाद्वारे...