ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्यातर्फे प्रत्येक शेतकऱ्यांच्या शेतातील माती परिक्षण मोफत केले जाईल : माजी आमदार चंद्रशेखर घुले

0

(अहमदनगर – प्रतिनिधी सुनिल नजन ) अहमदनगर जिल्ह्यातील नेवासे तालुक्यातील भेंडे येथील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखाना कार्यक्षेत्रातील प्रत्येक शेतकऱ्यांच्या शेतातील मातीचे मोफत परिक्षण करून देणार असल्याची माहिती कारखान्याचे माजी चेरमन आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार चंद्रशेखर घुले पाटील यांनी दिली. ते शेवगाव तालुक्यातील आव्हाणे येथील आंबादास कळमकर यांच्या किसान अँग्रो मार्ट या क्रुषीसेवा केंद्राच्या शुभारंभा प्रसंगी अध्यक्ष पदावरुन बोलत होते. प्रमुख पाहुणे म्हणून आळंदीचे ह.भ.प.उमेश महाराज दशरथे, अखिल भारतीय वारकरी मंडळाचे प्रदेश अध्यक्ष अनिल महाराज वाळके,ज्ञानेश्वर साखर कारखान्याचे संचालक काकासाहेब नरवडे,माजी संचालक आणि जेष्ठ नेते निव्रुत्ति पाटील दातिर, राजाजी बुधवंत हे होते. प्रारंभी आंबादास कळमकर यांनी प्रास्ताविका मधे किसान अँग्रो मार्टच्या मार्फत शेतकऱ्यांना दिल्या जाणाऱ्या सुविधांची माहिती दिली. या किसान अँग्रो मार्टचे संचालक गणेश कळमकर आणि हर्षद कळमकर यांनी उपस्थित मांन्यवरांचा सन्मान केला. माजी आमदार चंद्रशेखर घुले पाटील पुढे म्हणाले की जिल्हा परिषदेच्या आणि शासनाच्या क्रुषी विभागा मार्फत शेतीची पुर्णपणे तपासणी करुन आपल्या शेतीत कोणते पीक येईल याची माहिती शेतकऱ्यांना दिली जाईल. स्व.मारुतराव घुले पाटील यांची शिकवण होती की अगोदर आपला प्रपंच सांभाळा मग राजकारण करा त्याप्रमाणेच आजची पिढी घडत आहे. या कार्यक्रमास माजी जिल्हा परिषद सदस्य विनायक आहेर,विष्णू जगदाळे,संदिप वाणी, ह.भ.प.गवळी, वाणी,उदागे,निकम ई.महाराज मंडळीसह पंचक्रोशीतील अनेक मोठे शेतकरी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here