प्रदीप भाऊ गायकवाड यांच्या वाढदिवसानिमित्त ऑल इंडिया एससी एसटी रेल्वे एम्प्लाईज असोसिएशन मनमाड तर्फे त्यांचा सत्कार

0

मनमाड – ऑल इंडिया एससी एसटी रेल्वे एम्प्लाईज असोसिएशन ओपन लाईन चे अध्यक्ष प्रदीप भाऊ गायकवाड यांच्या वाढदिवसानिमित्त ऑल इंडिया एससी एसटी रेल्वे एम्प्लाईज असोसिएशन मनमाड तर्फे त्यांचा सत्कार करण्यात आला होता.यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून झोनल सचिव सतिश भाऊ केदारे, झोनल कार्यकारिणी सदस्य विजय भाऊ गेडाम, प्रविण भाऊ अहिरे, भुसावळ मंडल चे वाल्मिक देहाडे साहेब, नांदगाव शाखा चे साबळे साहेब, स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाचे शहराध्यक्ष संजय भालेराव, अक्षरमंच चे संपादक बाबासाहेब अहिरे, झांसी मंडल कार्यकारिणी सदस्य रजनिश स्वामी आदी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
यावेळी ओपन लाईन शाखा, मनमाड, मनमाड कारखाना अतिरिक्त मंडळ, ज्युनिअर इन्स्टिट्यूट मनमाड, कंन्झुमर्स को-ऑपरेटिव्ह सोसायटी ऑफ मनमाड, बहुजन युवक संघ, झांसी मंडल, नांदगाव ओपन लाईन, संदिप हॉटेल, मनमाड, स्वाभिमानी रिपब्लिकन पक्ष, मनमाड आदी संघटना व पक्ष तर्फे आयु.प्रदिपभाऊ गायकवाड यांच्या सत्कार करण्यात आला.यावेळी, वाल्मिक देहाडे, साबळे, संदिप धिवर, झोनल सचिव सतिश भाऊ केदारे आदी चे भाषणे झाली.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रत्नदीप पगारे यांनी केले तर आभार प्रदर्शन सम्राट गरूड यांनी केले.
कार्यक्रमाचे आयोजन ऑल इंडिया एससी एसटी रेल्वे एम्प्लाईज असोसिएशन, ओपन लाईन शाखा व कारखाना शाखा तर्फे करण्यात आले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here