
मुंबई – जगदीश का. काशिकर,कायदा (लॉ) / नाेकरी (जाॅब) सल्लागार (कन्सलन्टंट) व मुक्त पत्रकार*, महाराष्ट, व्हाटसअप – ९७६८४२५७५७,खाेपाेली – रायगड जिल्हा: करोना सारख्या महामारीने अनेक महिन्यांपासून संपूर्ण जगाला व्यापले आहे याचं काळात पेशंटच्या नातेवाईकांची गरज ओळखून वैद्यकीय क्षेत्रात मोठ्या प्रमाणात काळाबाजार व भ्रष्टाचार सुरू आहे.काहीच दिवसांपूर्वी खोपोली शहरातील रेमडीसीविरचा काळाबाजार करणाऱ्या टोळीचा नारायणगाव पोलिसांनी पडदा फाश केला. टोळीत शहरातील बड्या व्यापार्या बरोबरच एक नगरपरिषद कर्मचाऱ्यासह आणखी एकाचा समावेश होता. संबंधितांवर नारायणगाव येथे गुन्हा दाखल झाला असून न्यायालयाने 5 दिवसांच्या पोलीस कोठडीत रवानगी केली आहे.असे असले तरी या प्रकरणात आणखी काही नावे समोर येऊ शकतात अशी शहरात चर्चा सुरू आहे, त्यालाच अनुसरून या प्रकरणाची सखोल चौकशी करून या मध्ये सहभागी असणाऱ्या प्रत्येकाला कडक शासन करण्यात यावे असे निवेदन महाराष्ट्र संरक्षण संघटनेचे कार्याध्यक्ष धर्मेंद्र घाग, मार्गदर्शक प्रमोद मसुरकर व रायगड जिल्हा अध्यक्ष अक्षय भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली संघटनेच्या खालापूर विभागा मार्फत खोपोली पोलीस स्टेशन येथे देण्यात आले.या वेळी संघटनेचे तालुका अध्यक्ष निखिल पाटील, तालुका उपाध्यक्ष धनंजय अमृते, तालुका उपाध्यक्ष शिवतेज तावडे, कोषाध्यक्ष तुषार देशमुख, खोपोली शहर अध्यक्ष सुमित पाटील, उपाध्यक्ष असिफ शेख, सदस्य करण साळवी, आकाश कातपुरे ,निखिल भोईर, सागर पाटील, सागर गायकवाड,इ. पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.
