
सिल्लोड ( प्रतिनिधी- विनोद हिंगमीरे ) सिल्लोड तालुक्यातील वडाळा बोजगाव भराडी सह परिसरात मुसळधार पाऊस झाल्याने नदी नाले ओवरफ्लो झाले होते. अनेकांच्या शेतात पाणी शिरल्याने मका कपाशी आदी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे तसेच काही शेतकऱ्यांच्या शेतींना तलावाचे स्वरूप आले आहे एकीकडे पाऊस झाला म्हणून आनंदही आहे मात्र काही ठिकाणी नुकसानकारक पाऊस झाल्याने शेतकऱ्यांच्या चिंतेत मोठी वाढ निर्माण झाली आहे विशेष म्हणजे भराडी ते अंभई रस्त्यावरील वडाळा गावाजवळील पुलाची उंची ही कमी असल्यामुळे थोडा जरी पाऊस झाला की लगेच या पुलावरून पाणी वाहण्यास सुरुवात होते व तासनतास वाहतूक ठप्प होते गेल्या कित्येक दिवसापासून वडाळा येथील ग्रामस्थांनी फुला संबंधीत बांधकाम विभागाकडे मागणी केलेले आहेत परंतु नेतेमंडळी व शासकीय अधिकारी हे मात्र याकडे जाणून-बुजून दुर्लक्ष करत असल्याचं वडाळा येथील ग्रामस्थांनी सांगितले आज झालेल्या या मुसळधार पावसाने भराडी ते अंभई रस्त्यावरील पुलाला पूर आल्यामुळे जवळ जवळ दोन ते तीन तास वाहतूक ठप्प होते परंतु तरीसुद्धा पावसाचा जोर हा वाढतच असल्याने पुलाचे पाणी हे कमी न होता हे वाढतच होते.
वडाळा ते अंभई रस्त्यावरील पुलासंबंधी आम्ही अनेकवेळा वरिष्ठांकडे व बांधकाम विभागाकडे मागणी केलेली आहे. परंतू आमच्या मागणीला संबंधित विभागाचे अधिकारी हे मात्र जाणूनबूजून दुर्लक्ष करीत आहे.
बाबुराव डापके – ग्रामस्थ वडाळा
