‘ राजगृह ‘ वर हल्ला करणार्‍या समाज कंटकांना शिक्षा व्हावी- आरपीआय ,नांदगाव

0

नांदगाव ( प्रतिनिधी -निखील मोरे) डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच मुंबईतील निवासस्थान असलेल्या राजगृहावर अज्ञातांनी नासधूस केली.त्यांना अटक करून कडक शासन करावे, अशी मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया
शहर शाखेच्या वतीने तहसीलदार उदय कुलकर्णी यांना निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.तहसीलदार यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच मुंबईतील निवासस्थान असलेल्या राजगृहावर अज्ञातांनी नासधूस केली.या घटनेचा निषेध करतो.अज्ञातांना तात्काळ अटक करून कडक शासन करावे,अन्यथातिव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही निवेदनाच्या शेवटी देण्यात आला आहे.निवेदनावर रिपाई शहर प्रमूख महावीर जाधव संगीता वाघ,जफर शेख़ ,.गौतम काकळिज,दिपक मोरे,प्रविण इघे, प्रशांत गरूड आदीच्या स्वाक्षऱ्या आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here