कोणत्याही शेतकऱ्यांनी येणाऱ्या सिझनमध्ये व्रुद्धेश्वर कारखान्याचा काटा तपासावा ,पण विणाकारण आम्हाला बदनाम करण्याचा प्रयत्न करू नका ः आमदार राजळे

0

अहमदनगर (सुनिल नजन”चिफब्युरो”/अहमदनगर जिल्हा) येणाऱ्या गळीत हंगामात कोणत्याही उस उत्पादक शेतकऱ्यांनी व्रुद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याचा उसाच्या वजन मापाचा काटा तपासावा पण विणाकारण आम्हाला बदनाम करण्याचा प्रयत्न करू नका असा सबुरीचा सल्ला आमदार मोनिकाताई राजळे यांनी सभासदांना दिला. त्या व्रुद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या 53 व्या वार्षिक सर्व साधारण सभेत सभासदांच्या प्रश्नांना उत्तर देताना बोलत होत्या. अध्यक्ष स्थानी कारखान्याचे चेरमन अप्पासाहेब राजळे हे होते.उस तोडताना आम्ही कोणावरही जाणिव पुर्वक अंन्याय केला नाही.उसतोडणीच्या काळात शेतकी विभागाच्या अनेक अडचणी होत्या. उस तोडणीच्या बाबतीत जी हेळसांड झाली ती आता होणार नाही अशी ग्वाही त्यांनी दिली.मागील वर्षी ज्या चुका झाल्या त्या यावर्षी होणार नाहीत. कारखाना प्रशासन चोर आहे या नजरेने उगाचच प्रशासनाकडे पाहू नका.व्रुद्धेश्वर बद्दल आता कोणत्याही प्रकारची संशयाची सुई ठेवली जाणार नाही. असे सांगत नुसते फोटो पुरते आंदोलन करू नका असा टोला ही त्यांनी विरोधकांना लगावला. या वर्षी साडेचार ते पाच लाख मेट्रिक टण उस गाळपाचे उद्दिष्ट ठेवले आहे. ईथेनाँल प्रकल्प सुरू झाला आहे.त्याच्या कर्जाची परतफेड वेळेवर करायची आहे. असे त्यांनी सांगितले.प्रारंभी स्व.दादापाटील राजळे आणि स्व.राजीव राजळे यांच्या प्रतिमेचे पुजन करण्यात आहे. आणि अहवाल सालात जे उस उत्पादक सभासद, शेतकरी, कामगार, मयत झाले त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.तसेच म्रुतांच्या वारसांना विमा कंपणीच्या वतीने धनादेश वाटप करण्यात आले. अहवाल वाचन प्रभारी कार्यकारी संचालक आर जे महाजन, चिफ अकौंटंट एसटी राजळे यांनी केले. नुतन कार्यकारी संचालक अमोल ता.पाटील यांनी सभासदांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे दिली. भाउसाहेब कचरे सर यांनी छापील अहवालातील अनेक त्रुटी वाचून त्यावर आक्षेप नोंदवला. सभासदांचे उस अगोदर गेले पाहिजेत,उस गेल्यावर उस उत्पादक शेतकऱ्यांच्या मोबाईल वर लगेचच संदेश आला पाहिजे. उसाचे पेमेंट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होताच संबंधीत शेतकऱ्यांच्या मोबाइल वर मेसेज गेला पाहिजे. गेल्या वर्षी उसतोडणी कामगारांनी उसतोडण्यासाठी शेतकऱ्यांना वेठीस धरून जी आर्थिक पिळवणूक केली त्यामुळे संतापाने अनेक शेतकरी तुमच्या पासून दुर गेले आहेत. त्यांना कसे समजावणार असा सवाल कचरे सर यांनी उपस्थित केला. अगोदर तोडलेल्या उसाला 2700रू भाव आणि उशिरा तोडलेल्या उसाला 2900रू भाव हा दुजाभाव कशासाठी करता त्या पेक्षा सरसगट 3000रू भाव देण्याचा आग्रह शिवशंकर राजळे यांनी धरला. यावेळी साखर कारखान्याच्या सर्व संचालक मंडळासह उद्धवराव वाघ,राजेंद्र गवळी, साहेबराव गवळी, बाबासाहेब बर्डे, अर्जुराव राजळे, काकासाहेब शिंदे, विष्णू पंत अकोलकर, सुभाष बर्डे,कुशिनाथ बर्डे,नारायण धस,बद्रीनाथ सोलाट,नारायण कराळे, सतिश कराळे, सुभाष ताठे,उपाध्यक्ष रामकिसन काकडे, भास्कराव गोरे, आदिनाथ राजळे, संदिप राजळे,पोपटराव आंधळे,प्रभाकर गर्जे,अशोक गर्जे, हे आवर्जून उपस्थित होते.आभार राहुल राजळे यांनी मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here