मुंबईच्या “गिव्हिंग फाँर गुड फौंडेशन”वतीने मोहोजखुर्द येथील निवारा केंद्रास शालेय साहित्याचे वाटप

0

अहमदनगर (सुनिल नजन”चिफब्युरो” अहमदनगर जिल्हा) मुंबईच्या गिव्हिंग फाँर गुड फौंडेशनच्या वतीने अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील मोहोज खुर्द येथील मानवसेवा प्रतिष्ठान संचलित ” निवारा अनाथालय” केंद्रातील २८ विद्यार्थ्यांना शैक्षणिक शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. गिव्हिंग फाँर गुड फौडेशनच्या अध्यक्षा हिनल शहा मँडम यांनी मानवसेवा प्रतिष्ठानचे काम पाहून समाधान व्यक्त केले. भविष्यातही या निवारा केंद्रातील अनाथ विद्यार्थ्यांना योग्य ती भरीव मदत करणार असल्याचे हिनल शहा मँडम यांनी सांगितले.तसेच परीसरातील दानशूर व्यक्तींनी या संस्थेस मदत करावी असे आवाहन ही त्यांनी केले.त्यांच्या समवेत संस्थेचे सचिव प्रेमजी शहा,जोशी सर, हे आवर्जून उपस्थित होते. या प्रसंगी मोहोज गावचे माजी सरपंच श्रीधर वांढेकर,अमित जाधव,आदर्श अंगणवाडी सेविका सौ अलकाताई मतकर,देविदास मतकर, वैशाली मतकर, हे हजर होते.मानवसेवा प्रतिष्ठान चे अध्यक्ष प्रा.सुनिल मतकर सर यांनी संस्थेच्या कार्याची माहिती दिली.शुभम मतकर यांनी आभार मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here