अक्षरा सामाजिक प्रतिष्ठान ची यशस्वी सुवर्णमहोत्सवी घौडदौड

0

मुंबई, लालबाग,परेल (प्रतिनिधी-महेश्वर तेटांबे)स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३९४ व्या जयंतीचे औचित्य साधून अक्षरा सामाजिक प्रतिष्ठान या सेवाभावी संस्थेने नुकतेच महाराष्ट्रातील ५० वे (सुवर्णमहोत्सवी) असे मोफत आरोग्य चिकित्सा शिबिराचे आयोजन केले होते. हे शिबिर परेल व्हिलेज विभागातील नागरिकांसाठी युनिकेअर हेल्थ सेंटर यांच्या सहकार्याने आयोजित करण्यात आले होते.यावेळी संस्थेचे अध्यक्ष अमोल वंजारे यांनी सर्वांच्या सहकार्याने ५० वे मोफत आरोग्य चिकित्सा शिबिर यशस्वीरित्या पूर्ण करून शकलो आणि यापुढेही समाजातील तळागाळातील गरजवंतांसाठी विविध क्षेत्रात काम करण्याचा निर्धार व्यक्त केला. या शिबिरास स्थानिक नागरिकांनी उस्फुर्त प्रतिसाद दिल्याबद्दल संस्थेच्या वतीने जाहीर आभार व्यक्त करण्यात आले. याप्रसंगी समाजसेवक संदीप मोहिते यांची अक्षरा सामाजिक प्रतिष्ठानच्या मुंबई समन्वयक पदी व सौ.वसुधा वाळुंज यांची मुंबई समन्वयक (महिला) या पदावर नियुक्ती करण्यात आली. संस्थेच्या वतीने दोघांचे अभिनंदन करण्यात आले. या प्रसंगी जितेंद्र दगडू दादा सकपाळ, युनिकेअर हेल्थ सेंटरचे रमेश कांबळे, श्री साईनाथ वंजारे, सौ.ममता सावंत,कमलनाथ केरकर, समीर पेडणेकर, एकनाथ गोसावी, प्रदिप मोहिते, शिवाजी सातपुते, राजेश मेस्त्री, दत्ताराम कदम, संकेत मेजारी, परेश नरे आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने हजर होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here