अभिनेते रवी मोरे यांना मातृशोक

0

नवी मुंबई (कोपरखैरने – प्रतिनिधी- महेश्वर तेटांबे)अभिनेते आणि सामाजिक कार्यकर्ते तसेच ॐ कलामंच या संस्थेचे अध्यक्ष रवी मोरे यांच्या मातोश्रींचे कै. गं. भा. आक्काताई शिवराम मोरे (वय वर्षे ८०) यांचे त्यांच्या नवी मुंबई येथील राहत्या घरी दीर्घ आजाराने नुकतंच निधन झाले. त्यांच्या पश्चात त्यांच्या दोन मुली, एक मुलगा, जावई व नातवंडे असा परीवार आहे. नवी मुंबईत आक्काताई मोरे यांनी अनेक समाजोपयोगी कार्य करून समाजात एक वेगळा ठसा उमटविला होता. नवी मुंबईत घरातील चित्रीकरणासाठी येणाऱ्या प्रत्येक कलावंताला मग तो बॅकस्टेज आर्टिस्ट, तंत्रज्ञ अथवा अन्य कुणीही असो आक्काताई मोरे यांनी कधीही त्यांना उपाशीपोटी पाठवलं नाही. सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या आणि मनमिळाऊ स्वभावाच्या अशा आक्काताई मोरे यांनी अचानक घेतलेल्या एक्झिटमुळे नवी मुंबईत कमालीची शोककळा पसरून हळहळ व्यक्त केली जात आहे. त्यांच्या मृत आत्म्यास चिरशांती लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना..!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here