मुंबई :मागील वर्षीप्रमाणे याही वर्षी मराठा समाजाची संघटना एम्पावर आणि इतर कामोठा, कळंबोली, खारघर, तळोजा पनवेल, खांदा कॉलनी, करंजाडे इत्यादी शहरांमधील सकल मराठा समाजाच्या संघटनेच्या सहयोगाने, यावर्षी दिनांक 7 फेब्रुवारी ते 19 फेब्रुवारी शिवजयंतीच्या दिवसापर्यंत, मराठा समाजाच्या उद्योजकांचा मराठा महोत्सव कामोठे पोलीस ठाणे सामोरील ग्राउंड वर आयोजित करण्यात आलेला आहे.
सदरच्या मराठा महोत्सवाचे उद्घाटन मराठा योद्धा मनोज दादा जरांगे पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. उद्घाटना निमित्त एम्पावर सामाजिक संघटनेच्या वतीने कुणबी मराठा समाजाच्या प्रतीक असलेला नांगर संघर्ष योद्धा मनोज दादांना देऊन, त्यांचा गौरव करण्यात आला.याशिवाय मराठा समाज हा गरज लागल्यास युद्धाची तयारी ठेवतो, समाज लढवय्या आहे, याचे प्रतीक म्हणून तो लढायला घाबरत नसल्याने, एम्पावर संघटनेच्या वतीने मनोज दादा जरांगे यांना मानाची तलवार भेट देण्यात आली.तसेच मराठा समाजाने केवळ शेतकरी न राहता, सरकारी नोकऱ्यावर अवलंबून न राहता, स्वतः उद्योग व्यवसायामध्ये आले पाहिजे आणि समाजाची उन्नती केली पाहिजे, याचं प्रतीक म्हणून संघटनेच्या वतीने मनोज दादा जरांगे पाटील यांना तराजू भेट देण्यात आला.सदर मराठा महोत्सवाचे उद्घाटन करताना मनोज दादांनी सांगितले की, पनवेल महानगरपालिका परिसरातील नवी मुंबई परिसरामधील हजारो मराठ्यांनी तसेच इतर समाजाच्या बांधवांनी मोर्चाच्या वेळेस, महाराष्ट्र मधून आलेल्या लाखो करोडो मराठा बांधवांना एकही भाकरी कमी पडू दिली नाही. जेवणाची उत्तम व्यवस्था केली. याशिवाय जोपर्यंत सगेसोयरे या व्याख्येचे अंतर्गत मराठ्यांना, इतर मागासवर्गाचे आरक्षण मिळत नाही, तोपर्यंत त्यांच्या आंदोलन चालूच राहील याची समाजाला ग्वाही दिली.तसेच येत्या दहा तारखेपासून अंतरवाली सराटी येथे पुन्हा एकदा मनोज दादा उपोषणाला बसणार आहेत. त्यांचे हे आंदोलन चालूच राहणार आहे.मराठा महोत्सवाचे प्रास्ताविक एम्पावर संघटनेचे संकल्प श्री शहाजी भोसले यांनी केले आणि महोत्सवाची सांगता मराठा समाजाचे अर्जुन गरड यांनी आभार मानून केली.
सदर वेळी पनवेल महानगरपालिका परिसरातील मराठा समाजाच्या नगरसेविका लीना गरड, गणेश कडू, रायगड जिल्ह्याचे सकळ मराठा समाजाचे नेते विनोद साबळे , तसेच शिवसेनेचे महानगर प्रमुख रामदासजी शेवाळे व इतर सर्व सामाजिक संघटनाचे पदाधिकारी कार्यक्रम स्थळी उपस्थित होते. वर्किंग डे असताना सुद्धा आणि भर उन्हाची दुपारची वेळ असताना, सुद्धा शहरांमधील या कार्यक्रमास हजारो मराठा बांधवांनी उपस्थिती दाखवली.
Home Breaking News मराठा महोत्सवाचे उद्घाटन संघर्ष योद्धा मनोज दादा जरांगे पाटील यांच्या हस्ते संपन्न