संपूर्ण राज्यात आज धर्माच्या नावाखाली जातीय द्वेष पेरला जात आहे पण आध्यात्माच्या माध्यमातून सामाजिक समता बंधुता आणि जातीय सलोखा निर्माण करण्याची गरज आहे : आमदार पवार

0

अहमदनगर (सुनिल नजन अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी) आज संपूर्ण देशात आणि महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात धर्माच्या नावाखाली जातीय द्वेष पेरला जात आहे.पण आध्यात्माच्या माध्यमातून सामाजिक समता बंधुता आणि जातीय सलोखा निर्माण करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन कर्जत-जामखेडचे आमदार रोहीत पवार यांनी केले.ते भगवान गडावर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अॅडहोकेट प्रतापराव ढाकणे यांच्या समवेत भगवान बाबा समाधीच्या दर्शनासाठी गेले होते.तेथे ते बोलत होते.आमदार रोहीत पवार म्हणाले की राष्ट्रसंत भगवान बाबा यांच्या समाधीच्या दर्शनाने नवीन शक्ती आणि उर्जा निर्माण होउन अंन्यायाच्या विरोधात लढण्यासाठी बळ आणि प्रेरणा मिळते.संत भगवान बाबांनी दऱ्या खोऱ्यातील वंचित समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी समाज प्रबोधनाचे मोठे कार्य केले आहे. जुन्या काळातील जनतेला शिक्षणाचे महत्त्व पटवून दिल्याने आज महाराष्ट्रातील हजारो लाखो लोक सुशिक्षित झाले आहेत. आध्यात्मिक ज्ञानाबरोबरच समाज प्रबोधनाचे कार्य करताना जगाला सामाजिक समता, बंधुता व शांततेचा संदेश दिला.आज भगवान बाबाच्या विचारधारेची सर्व समाजाला नितांत गरज आहे.आपण सर्वांनी प्राप्त परिस्थितीचा सामना करण्यासाठी भगवान बाबाचे विचार अंगिकारले पाहिजे असे मत आमदार पवार यांनी व्यक्त केले.यावेळी भगवान गडाचे मठाधिपती डॉ. नामदेव शास्त्री सानप यांनी प्रतापराव ढाकणे आणि आमदार पवार यांचे जोरदार स्वागत केले.पवारांनीही शास्त्री यांचे दर्शन घेऊन आशीर्वाद घेतले.या प्रसंगी पवार आणि ढाकणे यांच्या समवेत राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष शिवशंकर राजळे, बंडू पाटील बोरूडे, सिताराम बोरूडे,महारूद्र किर्तने, राजेंद्र जगताप,किरण खेडकर, राजेंद्र हिंगे, योगेश रासने, गणेश सुपेकर, विष्णू थोरात,राजू ढाकणे, रामराव चव्हाण, श्रीराम फुंदे, बाळासाहेब बटुळे, विश्वनाथ खाडे, राजेंद्र बोरुडे,चंदू भापकर,भाउ तुपे,सुनिल ढाकणे, अंबादास राउत, यांच्या सह पुर्व भागातील अनेक गावांतील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.भगवान गडावर जाण्याच्या मार्गावर पाथर्डी,येळी,खरवंडी,या गावात आमदार रोहीत पवार यांचे जोरदार स्वागत करण्यात आले.खरोखरच भगवान बाबाच्या दर्शनाने मी धंन्य आणि समाधानी झालो असे पवार यांनी शेवटी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here