प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी वार्षिक स्नेहसंमेलन आयोजित

0

भडाणे :जिल्हा परिषद प्राथमिक शाळा भडाणे, तालुका चांदवड, जिल्हा नाशिक येथे प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी वार्षिक स्नेहसंमेलन आयोजित करण्यात आले होते . सुरुवातीला ग्रामपंचायत आवारातील ध्वजस्तंभाचे पूजन जेष्ठ नागरिक रमण श्रीपत आहेर यांनी केले. ध्वजस्तंभाचे ध्वजारोहण माननीय सरपंच रामदास दामू बनकर यांनी केले झेंड्याला सलामी देऊन राष्ट्रगीत,ध्वजगीत व महाराष्ट्र गीत सादर करण्यात आले. 75 वा प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला . यानंतर शालेय आवारात शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री समाधान आप्पा आहेर यांनी ध्वजस्तंभाचे पूजन केले. ध्वजारोहण मेजर सचिन सखाहरी आहेर व राहुल सुभाष आहेर यांनी केले.राष्ट्रगीत,ध्वजगीत, महाराष्ट्र गीत घेण्यात आले. ध्वजारोहणानंतर सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आला.विद्यार्थी मित्रांनी भाषणे केली. सांस्कृतिक कार्यक्रमात एकूण 13 गाणी घेण्यात आली. शाळेतील सर्व विद्यार्थ्यांचा सांस्कृतिक कार्यक्रमात समावेश होता .या प्रसंगी ओ माय फ्रेंड गणेशा, इंग्रजी नाटिका, वासुदेव आला, चला जेजुरीला जाऊ , चिऊताई चिऊताई माझ्या अंगणात ये, लल्लाटी भंडार, झुंजूमुंजू पहाट झाली, नाखवा बोटीने फिरवाल का, दैवत छत्रपती, फिर भी दिल है हिंदुस्तानी, देश रंगीला , तूने पायल है खनकाई या गाण्यांवर इयत्ता पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांनी सुंदर नृत्य सादर केले. या प्रसंगी बहुसंख्य माता पालक ग्रामस्थ हजर होते. विद्यार्थ्यांच्या अंगी असलेले कला गुण पाहून ग्रामस्थ भारावून गेले. या प्रसंगी पालकांनी विद्यार्थ्यांना रोख स्वरूपात बक्षिसे दिली. भडाणे ग्रामपंचायत ग्रामसेवक श्री खोकले भाऊसाहेब यांनी रोख स्वरूपात पाच हजार एक रुपये दिले. सोसायटीचे माजी चेअरमन दिलीप बाबुराव आहेर यांनी अकराशे रुपयाचे रोख बक्षीस दिले . दरवर्षी माझ्या कडून 1100/-रपयांचे रोख स्वरूपात बक्षिस राहील असे जाहीर केले. इतरही मान्यवरांनी रोख स्वरूपात बक्षिसे दिली . एकूण 8800 रुपये रोख स्वरूपात मिळाले .सर्वांनी लहान बालकांचे कौतुक केले . याप्रसंगी शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष समाधान आप्पा आहेर, उपाध्यक्ष जगदीश वाघ, भडाणे गावचे सरपंच श्री रामदास दामू बनकर, उपसरपंच भाऊसाहेब सोनवणे, तंटामुक्ती अध्यक्ष अनिल आहेर, माजी सरपंच सुनील शामराव आहेर, भागिनाथ धोंडीराम आहेर, ग्रामसेवक खोकले भाऊसाहेब, पोलीस पाटील सागर आहेर, सामाजिक कार्यकर्ते दौलत वाघ, अशोक आहेर , सोसायटी संचालक राजाराम वाघ तसेच बहुसंख्य माता पालक भगिनी, ग्रामपंचायतीचे, सोसायटी चे, शाळा व्यवस्थापन समितीचे सर्व सदस्य उपस्थित होते. श्री.दिलीप बाबूराव आहेर ,भागीनाथ धोंडीराम आहेर, रघुनाथ वाघ यांनी आपले मनोगत व्यक्त केले.कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्रहार चांदवड तालुका विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष चेतन अनिल आहेर,शालेय पोषण आहार स्वयंपाकी सरला वाघ, मदतनीस रघुनाथ वाघ, ग्रामपंचायत कर्मचारी राहुल वाघ, संगम गुंजाळ ,दुसाने मॅडम यांनी मदत केली, तंबाखूमुक्त शपथ घेण्यात आली.शेवटी सर्वांना खाऊ वाटप करण्यात आला. उपस्थित सर्वांनी जाधव सर व दुसाने मॅडम तसेच विद्यार्थ्यांचे कौतुक केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री सूर्यकांत जाधव सर यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here