जिल्हा टिंकरींग प्रयोगशाळे तर्फे शाळा क्र. ७१ मध्ये विज्ञान प्रात्यक्षिके संपन्न

0

नाशिक: जिल्हा टिंकरींग प्रयोगशाळे तर्फे शाळा क्र. ७१ मध्ये विज्ञान प्रात्यक्षिके संपन्न
सिडकोच्या हिंदूहृदयसम्राट मा. बाळासाहेब ठाकरे विद्याप्रबोधिनी मनपा शाळा क्र. ७१ मध्ये नाशिक जिल्हा टिंकरींग प्रयोगशाळेची विज्ञान व गणिताच्या विविध प्रात्यक्षिकांचे आयोजन करण्यात आले होते. प्रमुख अतिथींचा परिचय प्र. मुख्याध्यापक बाळासाहेब सातपुते यांनी करुन देत अतिथींचा सत्कार केला. तद्नंतर कार्यक्रमाचे डिजीटल उद्घाटन शाळेचे प्र. मुख्याध्यापक बाळासाहेब सातपुते यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमात नाशिक जिल्ह्यातील पहिले आयआयटीएन सेवानिवृत्त प्राचार्य डॉ. सुनिल बर्वे सर, रामाशिष भुतडा सर (आय आय टी, पवई ), रमेश जोशी सर यांनी विद्यार्थ्यांना विविध प्रात्यक्षिके दाखवली. त्यात डॉ. बर्वे सर यांनी गणितातील लोगो, जीओजीब्रा, स्क्रॅच साॅफ्टवेअर यांचा वापर करुन विविध गणिती व विज्ञानातील सूत्रांच्या साह्यायाने अब्राहम लिंकन, डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन, लालबहादूर शास्त्री यांची चित्रे रेखाटणे, विविध आकृतीच्या साहाय्याने विचारशक्तीला चालना देणे, पाणबुड्या, सायफन प्रयोग, मॅग्लेव ट्रेन, गुरुत्व मध्य इ. प्रयोग दाखवून त्यामागील वैज्ञानिक तत्वे, नियम व संबंधित शास्त्रज्ञांची माहिती सांगितली. तर रमेश जोशी सर यांनी टायमर सेट करणे, सेन्सर कार्यप्रणाली, रेल्वे हाॅर्न डाॅबलर इफेक्ट, टच अरलार्म, डोअर ओपनिंग अलार्म, वाॅटर लेव्हल कंट्रोलर, स्मोक अलार्म,,मेटल डिटेक्टर, मंत्र मशिन, वायरलेस ट्रान्समिशन, रनिंग लाईट, पोलिस व्हॅन अलार्म, सोलर स्टडी लॅम्प,सोलर फॅन इ. इलेक्ट्रॉनिक क्षेत्राशी संबंधित प्रात्यक्षिके दाखवून त्यामागील विज्ञान समजावून सांगितले . हि सर्व प्रात्यक्षिके विद्यार्थी स्वतः बनवू शकतात याचा आत्मविश्वासही यावेळी देण्यात आला.
विद्यार्थ्यांनी हि सर्व प्रात्यक्षिके समजावून घेऊन उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. कार्यक्रमात इ.६ वी ते ८ वी चे १५२ विद्यार्थी सहभागी झाले होते. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी प्र.मुख्याध्यापक बाळासाहेब सातपुते यांच्या मार्गदर्शनाखाली किसन काळे, विनोद मेणे, प्रमिला देवरे, रुपाली ठोक, योगिता खैरे, प्रविण गायकवाड यांनी प्रयत्न केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here