
मनमाड-एकात्मिक बालविकास सेवा योजना प्रकल्प नागरी नाशिक-२ अंतर्गत मुरलीधर नगर मनमाड येथील अंगणवाडी मधें आझादी का अमृत महोत्सव निमित्त प्रकल्प अधिकारी अजय फडोळ यांच्या मार्गदर्शना खाली चित्रकला स्पर्धा घेण्यात आली.ह्या वेळी एरियातील पालकवर्ग किशोरी,मुले यांनी उसफुर्त पणे स्पर्धेत सहभाग नोंदवला.प्रथम ,द्वितीय ,तृतीय क्रमांक काढण्यात आले.प्रथम क्र. मोहिनी खंबाईक, द्वितीय क्र.ऋषि ठाकरे ,तृतीय क्र.वेदांत खंबाईक उत्तेजनार्थ गौतमी गायकवाड सर्व स्पर्धकांचे बालविकास प्रकल्प नागरी नाशिक -२ अभिनंदन..सर्व विजेत्याचा 15 ऑगस्ट रोजी मुख्यसेविका शितल गायकवाड सुज्ञा खरे यांच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्यात येणार आहे. कार्यक्रमाचे आयोजन अंगणवाडी सेविका अन्नपूर्णा अडसुळे मदतनीस मोहिनी इप्पर यांनी केले.
