रत्नागिरी-सिंधुदुर्ग रहिवाशी मंडळाची १४ऑगस्टला सर्वसाधारण सभा

0

मुंबई : बदलापूर(गुरुनाथ तिरपणकर)-बदलापुरमधील रत्नागिरी-सिंधुदुर्ग जिल्हावासिय मंडळाचे बदलापूरकर आजीव सदस्य तसेच सर्वसाधारण सदस्य असणा-या रत्नागिरी-सिंधुदुर्ग रहिवासी मंडळाची २१वी वार्षिक सर्वसाधारण सभा रविवार दि.१४/०८/२२रोजी सायंकाळी ५वाजता,श्री अपार्टमेंट,शाॅप नं.४,दुसरा मजला,अभिनव बॅकेच्यावर,गांधी चौक,बदलापूर(पुर्व)येथे आयोजित केलेली आहे.या वार्षिक सभेत २०व्या वार्षिक सभेचा कार्यवृत्तांत वाचुन कायम करणे,३१मार्च २०२२अखेर संपलेल्या वर्षाचा अहवाल,उत्पन्न खर्चाचे ताळेबंद पत्रक स्विकारणे व त्यास मंजुरी देणे,सन २०२१-२०२२या वर्षाच्या हिशोब तपासणी अहवालाची नोंद घेणे,२०२२-२०२३या वर्षासाठी हिशोब तपासणीसांची व हिशोब लेखणिकाची नेमणूक करणे व अध्यक्षांच्यावतीने आयत्यावेळी येणा-या विषयांवर चर्चा करणे अशा वरील विविध विषयांवर चर्चा होणार आहे. तरी रत्नागिरी-सिंधुदुर्ग मंडळाच्या बदलापुरकर आजीव-सर्वसाधारण सभासदांनी या२१व्या वार्षिक सर्वसाधारण सभेस उपस्थित रहावे,असे आवाहन मंडळाचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील व चिटणीस मंगेश कदम यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here