नाशिक : ( प्रतिनिधी प्रशांत गिरासे वासोळ,मो- 9130040024) देवळा तालुक्यातील वासोळ येथील न्यु वासोळ विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीची चेअरमन पदासाठी घेण्यात आलेली निवडणूक बिनविरोध झाली असून चेअरमनपदी श्री दिलीप परशुराम सुर्यवंशी व व्हाय चेअरमन पदी श्री कैलास बाबुराव भामरे यांची सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली आहे.गेल्या वर्षी श्री अशोक लाला केदारे हे न्यु वासोळ वि का स सोसायटी चेअरमन होते. त्यांनी नुकताच आपल्या चेअरमन पदाचा राजीनामा दिल्याने निवडणूक घेण्यात आली. त्यात श्री दिलीप परशराम सुर्यवंशी यांची सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली.यावेळी झालेल्या सभेला गावातील ग्रामस्थ श्री स्वप्निल सुर्यवंशी, श्री महारु गिरासे, श्री दगा आहिरे, भिकुबाई निकम, श्री दयाराम खैरनार, अशोक केदारे, विक्रम बच्छाव , शिवाजी अहिरे,लहुसिंग गिरासे, रविंद्र निकम, केशव सुर्यवंशी उपस्थित होते.निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून श्री अनिल रामसिंग पाटील यांनी कामकाज पाहिले. त्यांना स्वप्निल सुर्यवंशी व महारु गिरासे यांचे सहकार्य मिळाले. निवडी नंतर श्री दिलीप सुर्यवंशी व कैलास भामरे यांचा सत्कार श्री दगा अहिरे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी शेतकरी, सभासद व ग्रामस्थ उपस्थित होते.
Home Breaking News देवळा तालुक्यातील वासोळ येथील न्यू वासोळ विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीची चेअरमन...