नाशिक 👉राष्ट्रीय पोषण महिना सप्टेंबर २०२१ हा दिनांक १ ते ३० सप्टेंबर अखेर साजरा केला जात आहे..”कुपोषण छोड पोषण की ओर..थामे क्षेत्रीय भोजन की डोर” ही टॕग लाईन घेवून पोषण महिना साजरा केला जात आहे..नागरी नाशिक-२ प्रकल्पातील १०० अंगणवाडी केंद्रांना हा पोषण महिना साजरा करण्यासाठीचे दैनंदिन उपक्रमांचे वेळापत्रक देण्यात आलेले आहे.कोरोनाची पार्श्वभूमी विचारात घेता.. पोषण महिन्यात जनजागृती करण्यासाठी जास्तीत-जास्त प्रमाणात सोशल मिडियाचा वापर करण्याचे आगाऊ नियोजन नागरी नाशिक-२ प्रकल्पात आॕगस्ट २०२१ मध्येच करण्यात आले आहे..यासाठी सर्व मुख्यसेविका, अंगणवाडी सेविका, मदतनिस यांची दोन वेळा आॕनलाईन बैठक घेण्यात आली. सर्वांशी चर्चा करुन कामकाजाचे नियोजन करण्यात आले.प्रकल्पातील अंगणवाडी सेविकांनी स्वतः पुढाकार घेवून विविध थिमवर आधारित छोटे-छोटे परंतु तितकाच प्रभावी संदेश जनतेपर्यंत पोहोचेल असे व्हिडिओ कुठल्याही व्यावसायिक आयुधांचा वापर न करता तयार केले..हे व्हिडिओ तयार करणेसाठी प्रकल्पातील अंगणवाडीताईंनी सुट्टीच्या दिवशीही मोठी मेहनत घेतली.यात पारंपरिक लोक कलांचा वापर करुन अगदी सोप्या भाषेत सर्वांना सहज समजतील असे व्हिडिओ या ताईंनी केले.यात वासुदेवाची स्वारी, जोगवा, पोषणाचे गोंधळी, बाल विवाह, AAAA ची संयुक्त गृहभेट, पोषणाची मंगळागौर, पोवाडा,पोषण प्रतिज्ञा, मुलीच्या जन्माचे स्वागत इ.व्हिडिओ तयार करतांना प्रकल्पातील अंगणवाडी केंद्र क्र.१ च्या कर्तव्यदक्ष अंगणवाडी सेविका पुष्पा वडजे यांनी विविध वेशभूषा साकार केल्यात…जन आंदोलन यशस्वी व्हावे यासाठी सदर सर्व व्हिडिओ अंगणवाडी केंद्र कार्यक्षेत्रातील लाभार्थींचे पालक यांना व्हाट्सअपचे माध्यमातून पाठविण्यात आले आहेत..तर पोषण अभियान हे जन आंदोलन असल्यामुळे फेसबुक, इंस्टाग्राम, ट्विटर, व्हाट्सअप, शेअर चॕट इ. सोशल मिडिया साधनांचा वापर करुन हे जन आंदोलन यशस्वी करण्याचा प्रयत्न प्रकल्पाने केला आहे..यासाठी अंगणवाडी सेविकारेखा शिंदे व अंगणवाडी मदतनिस कविता बर्वे यांनी प्रकल्पाचे टिममधील सर्वांना सातत्यपूर्ण मार्गदर्शन केले..तसेच त्यांनी, मुख्यसेविका शितल गायकवाड व गट समन्वयक शितल ठुबे यांनी स्वतः पुढाकार घेवून प्रकल्पाचे कामकाज विविध सोशल मिडिया साईटवर सादर केले..त्याबद्दल त्यांचे प्रकल्पात कौतुक केले जात आहे..तसेच या माध्यमातून “पोषणाच्या वर्तनात बदल घडवून आणण्यासाठीचे” व्हिडिओद्वारे तयार केलेले संदेश जास्तीत-जास्त जनतेपर्यंत पोहोचविले..लाभार्थी सर्वोच्च हितासाठी कायम कार्यतत्पर असणाऱ्या अंगणवाडी सेविका पुष्पा वडजे यांच्या या योगदानाचे सर्वच स्तरावरुन कौतुक केले जात आहे.
Home Breaking News राष्ट्रीय पोषण महिना सप्टेंबर २०२१ मध्ये नागरी नाशिक-२ प्रकल्पाने जनजागृती करणेकरिता तयार...