वासोळ: प्रतिनिधी प्रशांत गिरासे,मो.९१३००४००२४
येथील ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदी अनुश्री उमेश भामरे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. तात्कालीन उपसरपंच दिगंबर पवार यांनी आवर्तन पद्धतीने राजीनामा दिल्याने दि.१५ रोजी सरपंच अनिता खुरसाने यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत भामरे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.यावेळी ग्रामविकास अधिकारी नंदू सोनवणे, ग्रामपंचायत सदस्य अलकाबाई पगार,विलास अहिरे,सोनाली महाले,वंदना पवार,अशोक निकम,दिगंबर पवार,प्रमिला गिरासे,विजय पवार मा.सरपंच दगडू भामरे,चद्रकांत पाटील,दगा अहिरे,कैलास भामरे,केशव सुर्यवंशी,उमेश भामरे,साहेबराव पगार,योगेश महाले,संदीप अहिरे,गोरख भामरे,उत्तम भामरे,दिलीप सुर्यवंशी आदीसह नागरिक उपस्थित होते.