Home Breaking News कासार पिंपळगाव येथे मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियाना अंतर्गत तालुका स्तरीय समिती मार्फत...

कासार पिंपळगाव येथे मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियाना अंतर्गत तालुका स्तरीय समिती मार्फत विकास कामांची तपासणी, ग्रामपंचायतीची बक्षिसाकडे वाटचाल

0

अहिल्यनगर (सुनिल नजन “चिफब्युरो” स्पेशल क्राईम रिपोर्टर अहिल्यानगर जिल्हा)
कासार पिंपळगाव, तालुका पाथर्डी, जिल्हा अहिल्यानगर येथे मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियाना अंतर्गत ग्राम पंचायतीने केलेल्या विविध विकास कामाचे मुल्यांकन करण्यासाठी बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई पंचायत समितीचे गटविकास अधिकारी कैलास बळवंत साहेब यांच्या अध्यक्षते खालील कमिटीने कासार पिंपळ गावास भेट दिली.आणि विविध प्रकारच्या विकास कामांची तपासणी करून मुल्यांकन केले. या वेळी त्यांच्या समवेत पंचायत समितीचे विस्तार अधिकारी अशोकराव सावध,पंचायत समिती सदस्य राहुल दुबे,अक्षय कांबळे,पाथर्डी पंचायत समिती चे विस्तार अधिकारी रानमाळ साहेब,दुसरे विस्तार अधिकारी गिरे साहेब, ग्रामपंचायत विकास अधिकारी प्रमोद म्हस्के साहेब,प्रशासक मोनालीताई राजळे,माजी उपसरपंच आशा तिजोरे,मा. ग्रामपंचायत सदस्य अप्पासाहेब राजळे,अंकुश राजळे,उषा तुपे, संतोष शेळके,शरद म्हस्के,तात्यासाहेब भगत,संभाजी राजळे,योगिता भगत,नारायण भगत, दादासाहेब पवार,प्रविण तुपे, शिवाजी खोजे, गणेश भगत,संदिप राजळे,नवनाथ तिजोरे,विस्तार अधिकारी दादासाहेब शेळके,सुहास शेळके,अनंत राजळे, तलाठी ऋषिकेश घोरतळे,कृषि सहाय्यक खेडकर मॅडम,अभियंता राम राजळे,ग्रामपंचायत कर्मचारी संतोष लवांडे,अशोक तिजोरे,तुकाराम कांबळे,यांच्या सह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.प्रारंभी बाहेरून आलेल्या पाहुण्यांना गावाच्या वतीने सन्मानित करण्यात आले.यावेळी बचत गटातील महीलांना उत्कृष्ट सेवेबद्दल पाहुण्यांच्या हस्ते प्रमाणपत्र देण्यात आले.या मुख्यमंत्री समृद्ध अभियाना अंतर्गत गावाने केलेल्या विकास कामांची तयारी पाहून गटविकास अधिकारी कैलासराव बळवंत भारावून गेले.त्यांच्या समवेत आलेल्या तपासणी पथकाने कासार पिंपळगाव ग्रामपंचायतीने गावामध्ये केलेल्या विविध नाविन्यपूर्ण विकास कामांची प्रत्यक्ष भेट देऊन माहिती घेतली आणि प्रशंसा केली.तसेच गावातील तरुणांच्या मदतीने कमी खर्चात श्रमदानातून उभारलेल्या नाविन्यपूर्ण विकास विषयक उपक्रमाचे कौतुक केले.त्यांनी ग्रामपंचायत इमारत, दप्तरातील जमा खर्च नोंदी,रस्त्याच्या कडेने लावलेली झाडे,वेटरनरी दवाखाना,बंदिस्त गटार,कचरा व्यवस्थापन जाळ्या,प्राथमिक आरोग्य केंद्र,प्राथमिक शाळा, अंगणवाडी, वाचनालय, सार्वजनिक पाणीपुरवठा योजनेचे सौर ऊर्जा प्रकल्प, आधुनिक स्मशान भूमी,रस्ता दुरुस्ती,राजीव राजळे उद्यान,रस्त्याच्या कडेने लावलेली फुलझाडे,वृक्ष लागवड,घरकुला वरील सौर ऊर्जा प्रकल्प,आकर्षक रांगोळी या साऱ्या बाबींचे निरीक्षण करून आपला अभिप्राय नोंदवला आहे.शेवगाव पाथर्डी विधानसभा मतदार संघाच्या भाजपच्या हॅट्ट्रिक आमदार मोनिकाताई राजळे यांनी सकाळी सकाळी भेट देऊन पाहणी केली होती.आणि त्या पुढील दौऱ्यासाठी रवाना झाल्या होत्या.अहोरात्र मेहनत घेऊन गावाचा चेहरामोहरा बदलून टाकणाऱ्या माजी सरपंच आणि उत्तम (प्रशासक) सौ.मोनालीताई राहुल राजळे यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.कासार पिंपळगाव येथील विविध विकास कामे पाहून मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियाना तील बक्षीस मिळवण्या साठी आपली ग्रामपंचायत निश्चितच राज्य स्तरावर जाउ शकते असा महत्त्वपूर्ण विश्वास तपासणी अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. उत्तम प्रशासक म्हणून कार्यभार स्वीकारलेल्या मोनालीताई राजळे या म्हणाल्या की तुमच्या सर्वांच्या सहकार्याने विषेशत: तरूणांच्या श्रमिक योगदाना मुळेच आणि महिला भगिनींनी उचललेल्या खारीच्या वाट्यामुळे आपण ही वाटचाल यशस्वीपणे पार केली आहे.या यशात तुमचा सर्वांचा सींहाचा वाटा आहे.मी मात्र निमित्त होते.आमदार मोनिकाताई राजळे यांच्या मार्गदर्शना खाली या ग्राम पंचायतीची प्रगतीकडे वाटचाल सुरू झाली आहे.आपल्याला बक्षिस मिळालं की आपल्या सर्वांच्या मेहनतीचं चीज होईल अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.त्यांना गावातील अनेक महिलांची साथ लाभली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here