अहिल्या नगर (सुनिल नजन “चिफब्युरो” स्पेशल क्राईम रिपोर्टर अहिल्यानगर जिल्हा)
पुर्वी कोणे एके काळी तेव्हाचा अहमदनगर जिल्हा हा कम्युनिस्ट पक्षाचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जात होता.संपुर्ण अहिल्यानगर जिल्ह्यात कम्युनिस्ट पक्षाचेच वर्चस्व होते.राहुरी तालुक्यातील सोनगाव सात्रळ चे दिवंगत स्वातंत्र्य सेनानी पी.बी.कडू पाटील,पाथर्डीचे जेष्ठ नेते माजी आमदार बाबुजी आव्हाड, कारभारी वामन शिरसाट,काॅंम्रेड गंगाधर नजन,शेवगाव तालुक्यातील स्व.आबासाहेब काकडे,पोटफोडे,लांडे,बापुराव राशिनकर,पारनेर तालुक्यात ठुबे,नेवाशाचे दिवंगत आमदार स्वर्गीय वकिलराव लंघे पाटील,ही मंडळी कम्युनिस्ट पक्षाचे मोठ्या जिद्दीने काम करीत होते. पाथर्डी तालुक्यातील स्व. साहेबराव राजळे यांनी तर इंग्रजांना सळो की पळो करुन सोडले होते.त्यांना पकडण्यासाठी पोलिसांनी जंग जंग पछाडले होते परंतु ते सतत पोलिसांना हुलकावणी देत असत.मांडवे, तालुका पाथर्डी,जिल्हा अहिल्यानगर येथील कम्युनिस्ट पक्षाचे सक्रिय कार्यकर्ते काॅंम्रेड रामभाऊ आबाजी दातिर यांनी वयाची शंभरी पार केली तरी त्यांचा कम्युनिस्ट पक्षाचा पिंड आजही तेवढ्याच ताकदीने कायम आहे. त्यांचा जन्म सन १९२५ सालातील एप्रिल महिन्यात झाला होता.आज वयाची शंभरी पार केली तरी कम्युनिस्ट पक्षाचा झेंडा कायम त्यांच्या खांद्यावर राहिलेला आहे.मोडेल पण वाकणार नाही हा त्यांचा बाणा आजही कायम आहे.रामभाऊ दातिर हे पत्रकारीता क्षेत्रात काम करीत असत. त्या काळी सरकारच्या विरोधात कायम भुमिका घेत त्यांनी सरकारला चांगलेच धारेवर धरले होते.त्यांचे लिखान म्हणजे कम्युनिस्ट चळवळीतील धगधगत्या ज्वाळाचे नुसते निखारेच होते.त्यांच्या बातम्या म्हणजे सत्ताधारी मंडळींच्या विरोधात महात्मा फुले यांनी उगारलेला कष्टकरी शेतकऱ्यांचा आसूड होता. महाराष्ट्राच्या विधी मंडळात शेतकरी कामगार पक्ष,कम्युनिस्ट पक्षाचे अनेक आमदार होते.रामभाउ दातिर स्वतः म्हणत असत की मी ध्येयवादी कम्युनिस्ट पक्षाचा कार्यकर्ता आहे.माझ्या कम्युनिस्ट पक्षाची डावी विचारसरणी मी कधीच विसरणार नाही.कम्युनिष्ट पक्ष हा भ्रष्टाचार, धार्मिकता, स्वातंत्र्य,समता, बंधुता या तत्त्वांचा पुरस्कार करणाऱ्या विचारधारेचा पक्ष आहे.शेतकरी, शेतमजूर यांच्या हक्कासाठी लढणाऱ्या आणि देशाला प्रगतीकडे घेऊन जाणाऱ्या पक्षाचा मी कार्यकर्ता आहे याचा मला सार्थ अभिमान आहे.असे ते नेहमी म्हणत असत.स्वार्थी सत्तेच्या खुर्चीसाठी पक्ष बदलणाऱ्या दलबदलूंची संख्या वाढत असताना कम्युनिस्ट पक्षाशी एकनिष्ठ राहण्याची शपथ घेतलेल्या काॅंम्रेड रामभाऊ दातिर यांच्या कार्याचा आलेख पाहिला तर खरोखरच संपूर्ण देशाला अभिमान वाटत आहे.आज वयाची शंभरी पार केली तरी दातिर हे कम्युनिस्ट पक्षाशी आजही एकनिष्ठ राहिले आहेत.त्यांच्या पोशाखाची ओळख म्हणजे त्यांच्या डोक्यात आजही कम्युनिस्ट पक्षाची निशाणी असलेली लाल टोपी कायम आहे.त्यांच्या अंगात पांढरा शुभ्र शर्ट आणि पायजमा हा त्यांचा पेहराव कायम आहे. त्यांच्या पक्षाचे अनेक साथीदार त्यांना सोडून कायमची इहलोकीची यात्रा संपवून अनंतात विलीन झाले आहेत.परंतू आजही गत काळातील एखाद्याचे नाव काढले की अनेक साथीदारांच्या आठवणी जाग्या होऊन त्यांना शांत बसु देत नाहीत.आजही त्यांच्या खिशात लाल रंगाची डायरी आणि तीला रबराने गुंडाळलेली वळकटी दिसून येत आहे.त्या डायरीत कम्युनिस्ट पक्षाच्या विचारांचे प्रसिद्धी पत्रक तयार असते.तसेच अनेक महिलांना सरकारी योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी रामभाउ दातीर हे नेहमीच एसटी बस ने प्रवास करताना त्यांची चांगलीच दमछाक होत असते.तिसगाव, मीरी,कासार पिंपळगाव, पाथर्डी,नगर असा त्यांचा प्रवास नेहमीच सुरू असतो.वयाची एकसष्टी पार केल्यानंतर पाथर्डी तालुक्याची कामधेनू म्हणून संबोधल्या गेलेल्या वृद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अप्पासाहेब राजळे यांनी त्यांचा भव्यदिव्य असा नागरी सत्कार करून त्यांना तालुक्याच्या वतीने ६१ हजार रूपयांची थैली अर्पण केली होती.माणिक रामकिसन म्हस्के पाटील हे त्याचे आजही जिवंत साक्षिदार हयात आहेत.राजळे यांचा काॅंग्रेस पक्ष आणि दातीर यांचा कम्युनिस्ट पक्ष परंतु त्यांची मैत्री ही कधीही त्यांच्या पक्षाच्या आड आली नाही. अप्पासाहेब राजळे हे आमदार असताना दातीर यांनी सतत काॅंग्रेस पक्षाच्या विरोधात वैचारिक पातळीवर विरोध करून आक्रमक भूमिका घेतली होती पण त्यांनी कधीही एकमेकांना वाकड्या नजरेने पाहुन दुषणे दिली नाहीत.विरोध हा फक्त वैचारिक पातळीवर होता पण मैत्रीत कधीही कटुता निर्माण होऊ दिली नाही. स्वर्गीय बबनरावजी ढाकणे साहेब हे आमदार असताना पाथर्डी तालुक्याला वरदान ठरणाऱ्या वांबोरी चारी साठी राजाभाऊ झरकर,राजाभाऊ कुलथे,स्व.राम रत्नाकर,स्वर्गीय काॅंम्रेड नामदेवराव आव्हाड आणि रामभाऊ दातिर यांनी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने मोर्चा काढला होता.नंतर माजी खासदार स्वर्गीय बाळासाहेब विखे पाटील यांनी वांबोरी चारी साठी मंजुरी देऊन मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून दिला होता.आणि आता राहुरी पाथर्डी विधानसभा मतदार संघाच्या प्रत्येक निवडणुकीत आणि जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीच्या प्रचारातील दलबदलू उमेदवार हे वांबोरी चारीचे नाव घेऊन भांडवल करून मतांचा जोगवा मागताना दिसतात.रामभाउ दातीर हे कम्युनिस्ट पक्षाचे सक्रिय कार्यकर्ते होते तरीसुद्धा त्यांनी सांगितलेले काम सर्व पक्षांचे सत्तेवर बसलेले नेते हमखास करायचेच ही त्यांची ख्याती होती.सर्व पक्षात काय घडामोडी चालू आहेत याची सर्व माहिती त्यांच्या कडे हमखास पाहायला मिळत होती.दातीर हे एक चालते बोलते खुले व्यासपीठच होते. जनता दल, आणि काॅंग्रेस पक्षाच्या नेत्यांनी त्यांच्या कार्याची माहिती पाहुन त्यांना नेहमीच सहकार्य केले.वाट चुकलेल्या नेत्यांना थेट घरी जाऊन समज देणे ही त्यांची खासियत होती. कम्युनिस्ट पक्षाशी एकनिष्ठ राहण्याची शपथ घेतलेल्या रामभाऊ दातीर यांच्या एका मुलाला माजी आमदार स्व.बाबुजी आव्हाड यांनी आपल्या शैक्षणिक संस्थेच्या माध्यमातून नोकरी मिळवून दिली होती.पण दातीर यांनी आपल्या स्वार्थासाठी कधीच कोणाकडे हात पसरून कधीही काहीही मागितले नाही.राजकिय पक्षाची घराणेशाही आणि सोयरेधायरे (सोधापक्ष) यांच्या नातलग शाहीला विरोध करून त्यांनी नेहमीच आपल्या पत्रकारीतेच्या लेखन शैलीतून आसुडच ओढले.पाथर्डी तालुका नव्हे तर संपूर्ण नगर जिल्ह्यात त्यांनी सर्व पक्षात आपला वेगळा असा मित्र वर्ग निर्माण केला होता.पाथर्डीचे जुन्या पिढीतील पत्रकार शामसुंदर शर्मा,यांच्या सोबत त्यांची चांगलीच गट्टी जमली होती.त्यांनी खांद्याला खांदा लावून पत्रकारीता केली होती. आजच्या काळातील राजकीय पुढाऱ्यांची हुजरेगिरी करणारे काही लाचार पत्रकार दुसऱ्याची पत्रकारीता कशी धोक्यात येऊन संपेल याचा व्यर्थ खटाटोप करतांना दिसतात.दातीर यांनी पत्रकारीता करताना कोणाला त्रास ही दिला नाही की कोणाला वेठीस धरून ब्लॅकमेल ही केले नाही तर सडेतोड लिखाण करून चांगली जन जागृती निर्माण केली होती.आजही जिल्ह्यातील सर्व नामांकित पत्रकार वर्गात त्यांचे नाव आदराने घेतले जाते.प्रामाणिक पणा,सर्वांशी चांगले जातीय सलोख्याचे संबंध, ही त्यांची खासियत आहे. शेतकऱ्यांचे , शेतमजूरांचे सर्व सामान्य लोकांचे प्रश्न सुटावेत ही त्यांची प्रामाणिक इच्छा आहे. दातीर यांनी आज वयाची शंभरी पार करताना शारीरिक अडचणी वाढल्या आहेत.दिसायला कमी आणि ऐकायला कमी, तरीही पक्षाच्या कार्यक्रमात त्यांना हजेरी लावून आल्या शिवाय चैनच पडत नाही. आदर्श पक्षनिष्ठा कशी असते हे दातीर यांच्या कडून शिकले पाहिजे.रामभाऊ दातीर यांच्या पत्नी सौभाग्यवती आवडाबाई दातीर आज थकलेल्या असतानाही त्या रामभाऊ यांना आधार देतात त्यांची काळजी घेतात.रामभाऊ यांना अंजनाबाई, हरीभाऊ,आणि शिवाजीराव ही तिन आपत्ये झाली होती.अंजनाबाई यांना चार मुली आणि एक मुलगा होता.आणि १० नातू आहेत, हरीभाऊ यांना दोन मुले दोन मुली आहेत तर ५ नातू आहेत. शिवाजीराव यांना तिन मुली आणि दोन मुले आणि ७ नातू आहेत.असे एकूण मिळून २२ पणतू ही काॅंम्रेड रामभाऊ आबाजी दातीर यांची वंशवेल आहे.आजच्या युगातील हम दो और हमारे दो च्या जमाण्यात रामभाऊ दातिर यांच्या कुटुंबात एकूण ४१ व्यक्तीचे कुटुंब पाहून आजच्या पिढीला झनझनीत चपराक बसली आहे.आजच्या काळातील मी माझी बायको आणि माझी मुलं असं मर्यादित कुटुंब ठेवणाऱ्यांनी आता रामभाऊ दातिर यांचा आदर्श घेऊन एकत्र कुटुंब पद्धती निर्माण करून देशाच्या राष्ट्रीय एकात्मतेच्या दृष्टीने पुढे वाटचाल केली पाहिजे.तरच विवाह संस्था टिकून राहतील आणि नवीन समाज रचना घडविण्या साठी समाजातील घटस्फोटाचे प्रमाण कमी होईल.नगर जिल्ह्यातील कम्युनिष्ट पक्षाचा अवलिया म्हणून एकमेव प्रसिद्धी मिळालेल्या काॅंम्रेड रामभाऊ आबाजी दातिर यांच्या कार्याला लाल सलाम!
Home Breaking News अहिल्या नगर जिल्ह्यात कम्युनिस्ट पक्ष जिवंत ठेवण्यासाठी सदैव धडपडणारे काॅंम्रेड रामभाऊ दातिर...









