अहमदनगर – ( प्रतिनिधी सुनिल नजन ) अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील हनुमान टाकळी शिवारातील आसाराम पांडुरंग घुले हे रात्री झोपेत असताना अज्ञात चोरट्यांनी उशीखाली ठेवलेली चावी घेऊन घर उघडले, घरातील दोन पेट्या शेजारच्या शेतात नेऊन फोडून त्यातील सोने, रोख रक्कम घेऊन पुन्हा एकदा घराकडे आले आणि साखरबाई आसाराम घुले यांच्या गळ्यातील दागिने तोडून घेत असताना त्या जाग्या झाल्या असता त्यांनी आरडाओरडा केला. आसाराम घुले यांनी चोराचा पाठलाग केला असता त्यांच्यावर चोरांनी दगडफेक केली व ते जखमी झाले. त्यानंतर त्यांनी शेजारच्या घराला लावलेल्या कड्या उघडल्या मग घरातील सर्व लोक बाहेर पडल्याचे दिसताच अंधाराचा फायदा घेऊन चोर फरार झाले.शेजारच्या वस्तीवर जाउन आश्विनी संदिप बावणे यांच्या गळ्यातील गंठण ओरबाडून पळून गेले. नंतर नगर-शेवगाव रोडवरील ढवळेवाडी फाट्यावरच्या हाँटेल साईराज मधून गल्ल्यातील रोकड घेउन पसार झाले सदर घटनेची माहीती मिळताच पाथर्डी पोलीसस्टेशनचे कर्तव्यदक्ष पोलिस निरीक्षक रमेश रत्नपारखी यांच्या नेतृत्वाखालील पथकाने चोरांचा पाठलाग केला पण चोरांनी अंधाराचा फायदा घेऊन पोलिसांच्या हातावर तुरी देऊन ते पसार झाले.या बाबदची माहिती मिळताच अहमदनगर जिल्हा पोलिस अधीक्षक अखिलेश कुमार सींह,अतिरिक्त पोलीस अधीक्षक सागर पाटील, शेवगाव विभागाचे पोलिस उपअधीक्षक मंदार जवळे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाथर्डी पोलिस निरीक्षक रमेश रत्नपारखी आणि सहाय्यक पोलिस निरीक्षक वसंत पवार यांना सदर घटनेचा कसुन तपास करण्याचे आदेश दिले आहेत. लगेच घटनास्थळी श्वानपथकाबरोर फाँरेंन्सिक लँबच्या अधिकाऱ्यांना पाचारण करण्यात आले होते. काही संशयित वस्तू ताब्यात घेऊन त्या पुढील तपासासाठी प्रयोगशाळेत पाठवन्यात आलेल्या आहेत. याबाबत पाथर्डी पोलिस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर ४४१/२०२० कलम ३९५,३९७ अन्वये प्रमाणे आसाराम पांडुरंग घुले यांनी गुन्हा दाखल केला आहे.