मनमाड : आमदार सुहास अण्णा कांदे यांनी स्वच्छ व सुंदर मनमाड शहराच्या संकल्पनेचा शब्द नागरिकांना दिलेला होता तो आज पूर्ण झाला आहे, यांच्या प्रयत्नातून मनमाड शहरांतर्गत भुयारी गटारीसाठी 284.24 कोटी रुपयांच्या योजनेचा कार्यारंभ आदेश जारी करण्यात आला आहे.लवकरच या कामात सुरुवात होणार असून मनमाड शहरातील प्रत्येक भागात भुयारी गटार बांधली जाणार आहे.या आधी 13 मार्च 2025 रोजी नगरोत्थान महाअभिमान अंतर्गत मनमाड शहराच्या मल:निसारण प्रकल्पास प्रशासकीय मान्यता मिळाली होती.आज रोजी संबंधित योजनेचा कार्यारंभ आदेश आमदार सुहास आण्णा कांदे यांच्या हस्ते या योजनेचे काम मे पी. सी.स्नेहल कन्स्ट्रक्शन प्रायव्हेट लिमिटेड अँड ग्रीषवा इन्फ्रा प्रोजेक्ट एल एल पी यांच्या प्रतिनिधींकडे सोपविण्यात आला.
मुद्दे
मनमाड शहरांतर्गत भूमिगत गटार योजने मध्ये
162.17 किमी शहर अंतर्गत लांबीची पाईप लाइन ( भूमिगत गटार) असणार आहे.
18399 घर, इमारती कनेक्शन या योजनेत जोडल्या जाणार आहेत.
STP SEVER TRETMENT PLANT द्वारे प्रक्रिया झालेल्या पाण्याचे योग्य नियोजन केले जाईल…
सोबतच 300 KP सोलार PLANT उभारला जाणार आहे.
या संपूर्ण योजनेची एकूण किंमत 284.24 कोटी आहे.
यापूर्वी करंजवण मनमाड पाणीपुरवठा योजनेचे कार्य झाले असून मनमाड शहराचा प्रमुख पाणी प्रश्न मिटलेला आहे सोबतच स्वच्छ मनमाड शहराच्या संकल्पनेचा दिलेला शब्द या भुयारी गटार योजनेमुळे पूर्ण होणारा असून मनमाड शहराचे रूप यामुळे पालटणार आहे.
आमदार सुहास आण्णा कांदे यांनी संबंधित कंपन्यांच्या प्रतिनिधींना तात्काळ काम सुरू करण्याचे, दर्जेदार व उत्तम काम करण्याबाबत सूचना केल्या आहेत.या प्रसंगी फरहान दादा खान, सागर हिरे, प्रमोद भाबड, नगर अभियंता अभिजीत इनामदार , दीपक पांडे पाणी पुरवठा विभाग मनमाड नगर परिषद तसेच संबंधित कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.







