नाशिक : श्री. पंचवटी एज्युकेशन सोसायटी संचालित, “श्रीमती नर्मदाबेन पोपटलाल ठक्कर इन्स्टिटयूट ऑफ फार्मसी” महाविद्यालयात रॅगिंगविरोधी आठवडा उत्साहात साजरा विश्वविद्यालय अनुदान आयोग(UGC) च्या देशव्यापी उपक्रमांतर्गत “शिक्षण संस्था रॅगिंगमुक्त व्हाव्यात” या उद्देशाने श्री पंचवटी एज्युकेशन सोसायटीचे “श्रीमती नर्मदाबेन पोपटलाल ठक्कर इन्स्टिटयूट ऑफ फार्मसी”, नाशिक येथे 12 ते 18 ऑगस्ट 2025 रोजी रॅगिंगविरोधी दिन व आठवडा साजरा करण्यात आला. या उपक्रमाचा मुख्य उद्देश विद्यार्थ्यांमध्ये रॅगिंगच्या मानसिक, सामाजिक आणि कायदेशीर परिणामांविषयी जागरूकता निर्माण करणे, तसेच महाविद्यालयीन परिसरात सुरक्षित, सन्मानयुक्त आणि समावेशक वातावरण तयार करणे हा होता. तसेच परिसरात आणि महाविद्यालयाभोवती शांततेत रॅली काढण्यात आली. विद्यार्थी हातात फलक, पोस्टर आणि घोषवाक्यांसह उत्स्फूर्तपणे सहभागी झाले. विद्यार्थ्यांसाठी घोषवाक्य लेखन स्पर्धा आयोजित करण्यात आली. विद्यार्थ्यांनी आपल्या सृजनशीलतेद्वारे प्रभावी पोस्टर तयार केली. व विद्यार्थ्यांनी 30–60 सेकंदांची लघु व्हिडिओ रील्स तयार करून रॅगिंगविरोधी संदेश दिला. विद्यार्थ्यांमध्ये रॅगिंगचे परिणाम समजून घेण्याची जाणीव निर्माण झाली.परस्पर सहकार्य व एकोप्याची भावना वृद्धिंगत झाली.विद्यार्थ्यांनी रॅगिंगमुक्त परिसर राखण्याची जबाबदारी अंगीकारली. “भीतीविना शिक्षण (Education Without Fear)” या UGC च्या दृष्टिकोनाशी सुसंगत अशी शिक्षणसंस्कृती निर्माण करण्याच्या आमच्या संस्थेच्या प्रयत्नांना यामुळे अधिक बळ मिळाले आहे. या उपक्रमांतर्गत तृतीय वर्ष बी. फार्मसी आणि अंतिम वर्ष डिप्लोमा इन फार्मसीचे विद्यार्थी एकत्र येऊन शांततामय रॅलीचे आयोजन केले. या स्पर्धेचे आयोजन अनिता शिंदे मॅम यांनी यशस्वीपणे केले. तसेच मोलाचे मार्गदर्शन केल्याबद्दल आम्ही आमचे प्राचार्य डॉ. विशाल गुलेचा यांचे आभार मानतो आणि संस्थेचे अध्यक्ष मा. नरेंद्रभाई ठक्कर, उपाध्यक्ष प्रकाशभाई पटेल, सचिव देवेंद्र पटेल, फार्मसीचे सचिव उपेंद्र दिनानी, उपसचिव मा. श्री. अभयभाई चोकसी, दाता मा. राजेशभाई ठक्कर, विश्वस्त मंडळ, पदाधिकारी, शिक्षकवर्ग आणि शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन केले असून, त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
Home Breaking News श्री. पंचवटी एज्युकेशन सोसायटी संचालित, “श्रीमती नर्मदाबेन पोपटलाल ठक्कर इन्स्टिटयूट ऑफ फार्मसी”...







