अहमदनगर (सुनिल नजन “चिफब्युरो”स्पेशल क्राईम रिपोर्टर अहिल्यानगर जिल्हा) “कानून के हाथ, बहोत लंबे होते है” हा हींदी चित्रपटातील डायलाॅग शेवगाव तालुक्यातील पोलीसांना खरोखरच लागू पडत आहे. निष्पाप बालकाला रस्त्यावरील विहीरीत टाकून ठार मारले,मग पळून जाणाऱ्या आरोपीचे शेवगाव पोलीसांनी फत्तेपूर शिवारातच काम फत्ते केले.या बाबत मिळालेली माहिती अशी की बुधवार दिनांक २१ मे २०२५ रोजी सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास अहिल्यानगर जिल्ह्यातील शेवगाव तालुक्यातील जूने दहीफळ गावातील घोटन गावाकडे जाणाऱ्या रस्त्याने मयत अमन शाकीर शेख वय (१०वर्षे) आणि तोफिक सुभान शेख हे दोघे शारीरिक व्यायामासाठी रनिंग करीत जोराने पळत होते. त्याच रस्त्याने त्या जूने दहीफळ गावातील सचिन गोरख भारस्कर आणि पिनू गंगाराम भारस्कर हे दोघेजण प्रवास करत होते.रस्त्यावर रीमझीम पावसामुळे अत्यंत चिखल झाला होता.याच चिखलातून पायी चालत असताना अमन शाकीर शेख यांचा पाय घसरून तो सचिन गोरख भारस्कर यांच्या अंगावर पडला. याचा सचिन याला राग आला. त्याने पाय घसरून अंगावर पडलेल्या अमन शेख यास जोरदार मारहाण केली.आणि रस्त्याच्या कडेला असलेल्या विहिरीत उचलून फेकून दिले आणि जीवे ठार मारले. या बाबत मग शेवगाव पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा रजिस्टर नंबर ४७०/२०२५ भारतीय न्याय संहिता कलम १०३(१) प्रमाणे दिनांक २२ मे २०२५ रोजी बीबी गुलाब शेख वय (६५) राहणार जुने दहीफळ तालुका शेवगाव यांच्या मार्फत गुन्हा दाखल करण्यात आला.सदर गुन्ह्यातील संशयित आरोपी सचिन गोरख भारस्कर वय (२२वर्षे) राहणार जुने दहीफळ तालुका शेवगाव हा गुन्हा केल्यानंतर लगेचच गावातून फरार झाला होता. शेवगाव पोलिस स्टेशनचे कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक समाधान नागरे यांना गुप्त खबऱ्या मार्फत अशी माहिती मिळाली होती की या घटनेतील मुख्य आरोपी सचिन गोरख भारस्कर हा नेवासा मार्गे पुण्याला पळून जात आहे.मग पोलिस निरीक्षक समाधान नागरे यांनी एक पोलिस पथक तयार करून सदर आरोपीच्या मागावर शोध घेण्यासाठी तातडीने पाठवून दिले होते. सदर आरोपी हा नेवासा तालुक्यातून पुणे येथे पळून जात असताना फत्तेपूर शिवारातच त्याचा पाठलाग करीत पोलीसांनी त्याला रंगेहाथ पकडून त्याच्या मुसक्या आवळल्या.आणि शेवगाव पोलिस स्टेशनला आणून त्याला गजाआड केले. अहिल्यानगर जिल्ह्यात नव्याने बदलून आलेले जिल्हा पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांना हा आरोपी पकडून शेवगाव तालुक्यातील पोलिसांनी आपल्या कार्याचा ठसा उमटवून जोरदार तोफेची सलामी दिली आहे.नगरचे अप्पर जिल्हा पोलिस अधिक्षक प्रशांत खैरे, शेवगाव विभागाचे पोलिस उपअधीक्षक सुनिल पाटील,यांच्या मार्गदर्शनाखाली शेवगाव पोलिस स्टेशनचे कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक समाधान नागरे,पोलिस हेड कॉन्स्टेबल किशोर काळे आणि चंद्रकांत कुसारे,पोलिस कॉन्स्टेबल शाम गुंजाळ,राहुल खेडकर,संपत खेडकर, संतोष वाघ,प्रशांत आंधळे,पोलीस हेड कॉन्स्टेबल निलेश म्हस्के तसेच अहिल्या नगर जिल्हा दक्षिण सायबर सेलचे पोलिस काॅंन्स्टेबल राहुल गुड्डू, यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे. या गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक काटे हे करीत आहेत.अहिल्यानगर जिल्ह्याला नवीन जिल्हा पोलिस अधीक्षक म्हणून सोमनाथ घार्गे हे नव्याने बदलून आल्यामुळे शेवगाव तालुक्यातील अनेक सेंन्सेटीव्ह गुन्ह्यांचा तपास अजूनही वेगाने जारी करण्यात आला आहे.
Home Breaking News निष्पाप बालकाला रस्त्यावरील विहीरीत टाकून ठार मारले,मग पोलीसांनी पळून जाणाऱ्या आरोपीचे फत्तेपूर...