नाशिक : एस. एन. पी. टी. इन्स्टिटय़ूट ऑफ फार्मसीत “एस.एन.पी.टी. टॉक” सिरीज 3 “देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय फार्मा मार्केटिंगमधील नव्या संधी” या विषयावर चर्चा करण्यात आली, एस. एन. पी. टी. इन्स्टिटय़ूट ऑफ फार्मसीत “एस.एन.पी.टी. टॉक” ” सिरीज 3 या टीमने एक महत्वाची व्याख्यानमाला आयोजित केली “देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय फार्मा मार्केटिंगमधील नव्या संधी” चे आयोजन २२ फेब्रुवारी २०२५ रोजी झाले असून या व्याख्यानमालेचे प्रमुख मार्गदर्शक मान्यवर डॉ. रमेशधर जे. शुक्ला, यांचे उद्योग क्षेत्रातील अनुभव आणि ज्ञान विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी महत्त्वाचे ठरले. त्यांनी कार्यक्रमात विद्यार्थ्यांना विविध प्रकारच्या महत्त्वाच्या कौशल्यांबद्दल मार्गदर्शन केले. त्यात मुख्यत: संवाद कौशल्याचे महत्त्व, मुलाखतीसाठी तयारी कशी करावी, आणि करियर संधी या विषयांवर सखोल चर्चा करण्यात आली. फार्मा मार्केटिंग क्षेत्रातील बदलत्या ट्रेंड्स आणि दृष्टीकोण याबद्दल देखील सविस्तर माहिती दिली.सत्रामध्ये आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील आव्हानांची चर्चा देखील करण्यात आली. या आव्हानांचा सामना कसा करावा आणि ग्लोबल मार्केटमध्ये यश कसे मिळवता येईल यावर विचारमंथन झाले. सोबतच पेशेवर गोड आणि व्यक्तिमत्वाची रूपरेषाही कशी केली जाऊ शकते यावर देखील मार्गदर्शन करण्यात आले.कार्यक्रमाने विद्यार्थ्यांना फार्मा मार्केटिंग क्षेत्राच्या विविध पैलूंवर प्रकाश टाकला. या सत्राने विद्यार्थ्यांना भविष्यकाळातील करियरसाठी नवे दृष्टिकोन आणि संसाधनांचा वापर कसा करावा, याबद्दल उपयुक्त माहिती दिली. यावेळी कार्यक्रमासाठी संस्थेचे अध्यक्ष मा. श्री.नरेंद्रभाई ठक्कर, सचिव मा. श्री. देवेंद्रभाई पटेल, फार्मसी विभागाचे सचिव मा. श्री. उपेंद्रभाई दिनानी, संस्थेचे संयुक्त सचिव मा. श्री. अभयभाई चोक्सी. व प्राचार्य. डॉ. विशाल गुलेचा यांनी शुभेच्छा दिल्या.
Home Breaking News एस. एन. पी. टी. इन्स्टिटय़ूट ऑफ फार्मसीत “एस.एन.पी.टी. टॉक” सिरीज 3 “देशांतर्गत...








