Home Breaking News केदारेश्वर साखर कारखान्याचे चेरमन ऋषिकेश ढाकणे अडकणार…बेडीत

केदारेश्वर साखर कारखान्याचे चेरमन ऋषिकेश ढाकणे अडकणार…बेडीत

0

अहमदनगर (सुनिल नजन “चिफब्युरो” स्पेशल क्राईम रिपोर्टर अहिल्यानगर जिल्हा) अहिल्यानगर जिल्ह्यातील शेवगाव तालुक्यातील बोधेगाव परिसरातील केदारेश्वर सहकारी साखर कारखान्याचे विद्यमान चेरमन ऋषिकेश ढाकणे हे बीड जिल्ह्यातील पाटोदा येथील सौ वंदना व प्रा.डॉ.वसंतराव गहिनीनाथ सानप यांची सुकन्या चि.सौ.का.ऐश्वर्या हिच्याशी २० फेब्रुवारी रोजी सायंकाळी सात वाजता अहिल्यानगर येथील सावेडी परीसरातील हुंडेकरी लाॅन येथे लग्नाच्या बेडीत अडकणार आहेत. ऋषिकेश ढाकणे हे राष्ट्रवादी काँग्रेसचे शरदचंद्र पवार गटाचे प्रांतिक सरचिटणीस ॲडहोकेट प्रतापराव बबनराव ढाकणे यांचे चिरंजीव आहेत. या प्रकरणाचे साक्षिदार होण्यासाठी संपूर्ण राज्यभर असलेले ढाकणे समर्थक यांनी त्यांचे चाहते यांनी आवर्जून उपस्थित रहावे असे आवाहन ढाकणे परीवाराच्या वतीने करण्यात आले आहे. ऋषिकेश ढाकणे हे अत्यंत हुशार आणि जिज्ञासू राजकीय वारसा लाभलेले माजी केंद्रीय मंत्री नामदार स्वर्गवासी बबनराव दादाबा ढाकणे यांचे नातू आहेत. पाथर्डी तालुक्यातील भालगाव जिल्हा परिषद गटाच्या माजी सदस्य ॲडहोकेट सौ.प्रभावती प्रतापराव ढाकणे या ऋषिकेश ढाकणे यांच्या मातोश्री आहेत.अहमदनगर जिल्ह्यातील शेवगाव -पाथर्डी विधानसभा मतदारसंघातील सर्व सामान्य मतदारांची या कार्यक्रमासाठी उपस्थित राहुन या सोहळ्याची शान वाढवावी अशी विनंती ढाकणे परीवाराच्या वतीने करण्यात आली आहे. ऋषिकेश ढाकणे हे लग्नाच्या बेडीत अडकणार असल्याने साखर कारखान्या बरोबर त्यांच्यावर कौटुंबिक जबाबदारीही वाढणार आहे.अत्यंत कमी वयात सहकारातील एवढ्या मोठ्या साखर कारखान्याची धुरा समर्थपणे खांद्यावर घेऊन जबाबदारी पेलणारे ऋषिकेश ढाकणे हे एकमेव युवा नेते आहेत.त्यांच्या शुभविवाहास राज्यातील व अहमदनगर जिल्ह्यातील संपादक पत्रकारांच्या वतीने आणि नजन परीवाराच्या वतीने हार्दिक शुभेच्छा,

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here