Home Breaking News कोपरे गावचे माजी सरपंच रमेश आव्हाड यांच्या मातोश्री सुंदरबाई एकनाथराव आव्हाड यांचे...

कोपरे गावचे माजी सरपंच रमेश आव्हाड यांच्या मातोश्री सुंदरबाई एकनाथराव आव्हाड यांचे दुःखद निधन

0

अहमदनगर‌  (सुनिल नजन “चिफब्युरो”स्पेशल क्राईम रिपोर्टर/ अहिल्यानगर जिल्हा प्रतिनिधी ) अहिल्यानगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील कोपरे गावचे दहा वर्षे पदावर असलेले माजी सरपंच रमेश आव्हाड यांच्या मातोश्री सुंदरबाई एकनाथराव आव्हाड यांचे आजार पणामुळे बुधवारी दिनांक बारा फेब्रुवारी रोजी रात्री आठ वाजून दहा मिनिटांनी वयाच्या 84व्या वर्षी दुःखद निधन झाले. त्यांच्या पश्चात पती एकनाथ राव ,एक मुलगा रमेश, सुनबाई सुनिताताई,नातू गणेश, नाती सिमा राणी, दोन विवाहित मुली, नातवंडे, पतवंडे, असा परिवार आहे. ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक आणि वडुले खुर्द येथील रहिवासी साहेबराव पाटील आंधळे यांच्या त्या भगिनी होत्या. त्या अत्यंत धार्मिक आणि मनमिळाऊ स्वभावाच्या होत्या.ज्या दिवशी निधन झाले त्या दिवशी त्यांनी मी आज देवाघरी जाणार असल्याचे पत्रकारा समक्ष नातवाला सांगितले होते.याचे सर्वांना आश्चर्य वाटले.तिन तास पत्रकारांशी संवाद साधत ,साधक बाधक विषयावर व आजार पणा विषयी चर्चा झाली .उपस्थित मुली आणि नातेवाईकांना वाटले आईचं आरोग्य सुधारत आहे पण नियतीच्या मनात काहीतरी वेगळंच होतं. आणि रात्री आठ वाजता चहापाना नंतर दहा मिनिटांनी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आणि या जगाचा कायमचा निरोप घेतला.त्यांच्या अंत्यविधीसाठी नदिकिनारी मोठा जनसागर उसळला होता. सर्वच धार्मिक, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, सहकार , क्षेत्रातील व पंचक्रोशीतील आजी माजी सरपंच, विविध संस्थांचे अधिकारी,पदाधिकारी, असे अनेक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. विशेषत: आंधळे, आव्हाड, दगडखैर, पालवे, बुधवंत,फुंदे, घुले,उघडे, वाघमोडे या परीवारातील उपस्थिती जास्त होती.त्यांचा दशक्रिया विधी शुक्रवार दिनांक 21 फेब्रुवारी 2025 रोजी सकाळी नऊ वाजता कोपरे,तालुका,पाथर्डी जिल्हा अहिल्यानगर येथे व्रुधानदी किनारी होणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here