भडाणे: जिल्हा परिषद प्राथमिक शाळा भडाणे ,तालुका चांदवड, जिल्हा नाशिक येथे 76 वा प्रजासत्ताक दिन मोठ्या आनंदाने साजरा करण्यात आला. शालेय व्यवस्थापन समिती उपाध्यक्ष भारत दिलीप वाघ यांनी ध्वज स्तंभाचे पूजन केले व ध्वजारोहण शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष सागर कैलास आहेर यांनी केले . यावेळी तिरंग्याला सलामी देऊन राष्ट्रगीत, ध्वजगीत व महाराष्ट्र गीत सादर करण्यात आले.याप्रसंगी विद्यार्थ्यांनी इंग्रजीतून व मराठीतून भाषणे केली. वार्षिक स्नेहसंमेलन अंतर्गत सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आला. याप्रसंगी एकंदरीत मराठी शाळा व अंगणवाडी शाळा यांचे मिळून 13 गाण्यांवर नृत्य सादर करण्यात आले. उपस्थित सर्व मान्यवरांकडून संविधान वाचन करून प्रतिज्ञा घेण्यात आली. सांस्कृतिक कार्यक्रम पाहून गावातील सर्व लोकांनी समाधान व्यक्त केले. खूप आनंद व्यक्त केला. याप्रसंगी शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष सागर कैलास आहेर यांनी सर्व विद्यार्थ्यांना वही आणि पेन्सिल चे वाटप केले तसेच दत्तू भिलू आहेर यांनी सर्व मुलांना बिस्किटांचे वाटप केले . याप्रसंगी दिलीप बाबुराव आहेर व भागिनाथ धोंडीराम आहेर यांनी आपले मनोगत व्यक्त केले दिलीप बाबुराव आहेर यांनी दरवर्षी शाळेच्या सांस्कृतिक कार्यक्रमांना अकराशे रुपये देण्याचे कबूल केले .एकंदरीत आज सांस्कृतिक कार्यक्रमांना बक्षिसांच्या रुपाने लोकवर्गणी गोळा झाली.कार्यक्रम यशस्वीतेसाठी शाळेतील शिक्षिका दुसाने मॅडम, धनश्री आहेर मॅडम ,अंगणवाडी शिक्षिका निकम मॅडम ,शालेय पोषण आहार स्वयंपाकी सरला वाघ, मदतनीस रघुनाथ सुखदेव वाघ ,चेतन आहेर ,अंकुश वाघ, महेंद्र भाऊ वाघ, अतुल वाघ त्याचप्रमाणे ग्रामपंचायत कर्मचारी राहुल वाघ, संगम गुंजाळ यांनी मदत केली. कार्यक्रमाला बहुसंख्य पालक, माता, ग्रामस्थ मंडळी, सरपंच उपसरपंच, ग्रामसेवक भाऊसाहेब, ज्येष्ठ श्रेष्ठ मान्यवर, तरुण मित्र मंडळ, विविध शासकीय कर्मचारी, शाळा व्यवस्थापन समितीचे सर्व सदस्य, सोसायटी चेअरमन संचालक मंडळ उपस्थित होते. शेवटी सर्वांना खाऊ वाटप करण्यात आला .कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळा प्रमुख सूर्यकांत जाधव सर यांनी केले.








