येवला : येवला तालुक्यातील कुसमाडी येथे दरवर्षीप्रमाणे यंदाही ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते श्रीहरी अहिरे व वसंत घोडेराव यांच्या पुढाकाराने भीमा कोरेगाव प्रति येथील कुस्मडी गावात भीमा कोरेगाव शौर्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला
गावातून मिरवणूक काढत ध्वजाला सन्मानपूर्वक सलामी व मानवंदना देऊन भीमा कोरेगाव उत्सव समितीच्या वतीने महापुरुषांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले
त्यानंतर आदरणीय भंते यांच्या हस्ते सामूहिक त्रिशरण व पंचशील ग्रहण करण्यात आले त्यानंतर
यावेळी आलेल्या मान्यवरांचा सत्कार ही करण्यात आला त्यानंतर प्रबोधनात्मक गीत गायनाचा आंबेडकर अनुयायांनी आनंद लुटला यावेळी भिवसन गायकवाड गारखेडा यांच्यावतीने अन्नदानाचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता तर तालुक्यातून आंबेडकर प्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी हरिभाऊ अहिरे, वसंत घोडेराव सुरेश अहिरे रामदास अहिरे दिलीप अहिरे शंकर पठारे गौतम लिहिणार बाबुराव लिहिणार कृष्णा अहिरे यांच्यासह गावातील नागरिकांनी परिश्रम घेतले,








