अहमदनगर (सुनिल नजन”चिफब्युरो” अहिल्यानगर जिल्हा) अहमदनगर जिल्ह्यातील २२२ शेवगाव/पाथर्डी विधानसभा मतदारसंघातील भाजपच्या विद्यमान आमदार मोनिकाताई राजळे यांना तिसऱ्यांदा पक्षाची उमेदवारी जाहीर होताच अहमदनगर जिल्हा परिषदेच्या महिला आणि बालकल्याण समितीच्या माजी सभापती सौ.हर्षदाताई काकडे यांनी जोरदार विरोध करीत लगेचच विधानसभा निवडणुकीसाठी राजळे यांच्याविरोधात दंड थोपटून आपला अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल करण्याची घोषणा केली.यावेळी उपस्थित सर्व प्रमुख कार्यकर्त्यांनी एकीचे बळ दाखवून हात उंचावून”ताई तुम्ही ही निवडनुक लढाच” आम्ही तुमच्या पाठीशी आहोत असे विधान करून एक दिलाने काम करण्याचे आश्वासन दिल्यानंतरच काकडेंनी हा निर्णय जाहीर केला. आदर्श आचारसंहितेचे पालन करून आपण ही निवडणूक लढवणार असल्याचे सर्वांनीच सांगितले. भाजपची उमेदवारी आपल्यालाच मिळेल ही अपेक्षा सर्वांनाच होती.पण ती फोल ठरली.आता गुरूवारी 24 आँक्टोबर रोजी जनशक्ती मंचतर्फे जोरदार शक्तिप्रदर्शन करीत उमेदवारी अर्ज दाखल करण्यात येणार असून सर्वानीच मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले. आता हर्षदाताई काकडेंच्या विरोधात खोट्या वावड्या उठवल्यावर तेथेच त्याचा समाचार घेतला जाईल असेही यावेळी निक्षून सांगण्यात आले. अँडव्होकेट शिवाजीराव काकडे यांनी विरोधातील सर्व कारखान्यातील साखर कारखानदारांना एक जाहीर टोला लगावला की सर्व साखर कारखान्यानी विधानसभा निवडणुकीचे अर्ज दाखल करण्या अगोदर उस उत्पादक शेतकरी यांचे थकलेले उसाचे पेमेंट आणि कारखान्यातील साखर कामगार यांचे थकलेले पगार द्या आणि मगच आपले विधानसभा निवडणुकीचे उमेदवारी अर्ज दाखल करा. या आदेशाच्या पाश्र्वभूमीवर सर्वांनीच या निर्देशाचे टाळ्या वाजवून जोरदार स्वागत केले. आता फक्त वीस पंचवीस दिवस शिल्लक आहेत सर्व प्रमुख कार्यकर्त्यांनीच ही निवडणूक हातात घेऊन कामाला लागावे असे आवाहन भावी आमदारकीच्या उमेदवार सौ.हर्षदाताई काकडे यांनी केले. यावेळी प्रुथ्वीसींह काकडे ,जेष्ठ नेते जगन्नाथ पाटील गावडे,भाऊसाहेब पोटफोडे,रामकिसन घनवट,माणिक म्हस्के,यांच्यासह अनेक मान्यवरांनी आपले विचार व्यक्त केले. शेवगाव तालुक्यातील अनेक प्रमुख गावातील मुख्य कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थितीत होते.
Home Breaking News कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर सौ. हर्षदाताई काकडे चोवीस तारखेला विधानसभा निवडनुकीचा अपक्ष उमेदवारी अर्ज...