मनमाड : मध्य रेल्वे(मुंबई )चे मुख्य इंजिनिअर.संजीव कुलश्रेष्ठ यांनी आज मनमाड वर्कशॉपला भेट दिली.
यावेळी ऑल इंडिया एससी एसटी रेल्वे एम्प्लाईज असोसिएशन मनमाड च्या शिष्टमंडळाने कारखाना शाखेचे अध्यक्ष सतिश भाऊ केदारे यांच्या नेतृत्वाखाली यांची भेट घेऊन त्यांचा सत्कार केला.व त्यांना कामगार समस्या संदर्भात एक निवेदन दिले.
यावेळी कारखाना मुख्य प्रबंधक सचिन मुंगसे पाटील हे उपस्थित होते.
सदर निवेदनात
(१)मनमाड वर्कशॉप मधील ग्रुप डी व सी च्या रिक्त पदे भरण्यात यावे.
मनमाड वर्कशॉप मध्ये एकूण जागांपैकी ७७%पदे ही ग्रुप डी चे रिक्त आहे.२३%पदे भरली आहे.
आर.आर.बी. कडून रिक्त पदे भरण्यात यावी.
(२)मनमाड वर्कशॉपसाठी नवीन वर्कऑडर मिळावी किंवा नवीन काम मिळावे
(३) मनमाड वर्कशॉप मधील जे कर्मचारी स्वेच्छेने बंडनेरा येथील रेल्वे वर्कशॉप येथे बदलीवर जात आहे,त्या कर्मचाऱ्यांना कार्यमुक्त करण्यात यावे.
यासह विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले.
शिष्टमंडळात कारखाना शाखा वरिष्ठ उपाध्यक्ष संदिप पगारे, सहाय्यक सचिव सुनील सोनवणे, माजी अतिरिक्त सचिव रमेश पगारे, सहाय्यक संघटक हर्षद सुर्यवंशी,सचिन इंगळे,शरद झोबाड,विशाल त्रिभुवन, पंढरीनाथ पठारे,राजेश जगताप, मनोज गंवाडे, अर्जुन बागुल आदी होते.
Home Breaking News मध्य रेल्वे(मुंबई )चे मुख्य इंजिनिअर.संजीव कुलश्रेष्ठ यांनी आज मनमाड वर्कशॉपला भेट








