प्रेषित साधू सुंदर सिंग मेमोरियल कम्युनिटी प्रेयर हॉल एकलोसिया प्रार्थना भवनचे उद्घाटन

0

मनमाड : मनमाड येथे प्रेषित साधू सुंदर सिंग मेमोरियल कम्युनिटी प्रेयर हॉल एकलोसिया प्रार्थना भवनचे उद्घाटनाप्रसंगी आमदार सुहास आण्णा कांदे यांच्या वतीने युवासेना जिल्हाप्रमुख फरहान(दादा) खान यांनी उपस्थित राहून ख्रिस्ती धर्माचे फादर प्रतोद बेन्सन व इतर ख्रिस्ती धर्म गुरुचा सत्कार करण्यात आला. तसेच ख्रिस्ती धर्माचे गुरु यांनी करंजवण मनमाड पाणीपुरवठा योजना यशस्वीरित्या पूर्ण केल्याबद्दल आमदार सुहास अण्णा कांदे यांचे अभिनंदन केले व पुढील भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
याप्रसंगी शिवसेना तालुकाप्रमुख साईनाथ गिडगे, माजी नगराध्यक्ष योगेश पाटील, महिंद्र शिरसाठ, युवासेना शहर अधिकारी योगेश इमले, उपशहर प्रमुख मुकुंद झाल्टे, लोकेश साबळे, आरपीआय शहर सचिव एडवोकेट प्रमोद अहिरे, मिलिंद पाथरकर, ऋषिकांत आव्हाड, दिलीप सूर्यवंशी, सिद्धार्थ छाजेड, अजिंक्य साळी, कामगार नेते निलेश सपकाळे, जॉनी जॉर्ज, सरला घोगळ, रूपाली गालफाडे इतर शिवसेनेचे पदाधिकारी व महिला आघाडीच्या पदाधिकारी उपस्थित होत्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here