Home Breaking News कोकणात “राधा ही बावरी” या विनोदी हास्यप्रधान नाटकाला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद.

कोकणात “राधा ही बावरी” या विनोदी हास्यप्रधान नाटकाला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद.

0

वैभववाडी (प्रतिनिधी-विलास चौकेकर)

श्री दत्त जयंती उत्सव निमित्त आणि श्री काझरेश्वर कलामंच (मुंबई) प्रस्तुत उमेश चौकेकर निर्मित, दशरथ राणे लिखित आणि विलास (बाळा) चौकेकर दिग्दर्शित तुफान मराठी हास्यप्रधान दोन अंकी नाटक “राधा हि बावरी” या नाटकाचे दोन प्रयोग नुकतेच देवगड येथील श्री दत्तगुरु मंदिर पटांगण (काझरवाडी) येथे आणि पाचल येथील (खापने वाडी) या ठिकाणी रसिक प्रेक्षकांच्या गर्दीत संपन्न झाले. उदंड प्रतिसाद लाभलेल्या या नाटकात गौरव साटम, प्रसाद खापणे, किशोर चौकेकर, बाबू शेट्ये, दुर्गेश साटम, शैलेश शेट्ये, भालचंद्र (आबा) गोरीवले, कार्तिका पाटोळे आणि सिनेस्टार महेश्वर भिकाजी तेटांबे आणि विलास (बाळा) चौकेकर आदी कलावंतांनी सहभाग घेतला होता. त्याचबरोबर निर्मिती प्रमुख राजन (बबलू) कदम, रंगभूषाकार गुरु चौकेकर, संगीतकार प्रवीण बाईत, प्रकाशयोजना राजा (सिंगर) भस्मे, वेशभूषा भालचंद्र (बबन) गोरीवाले, ध्वनी संकलन राजा धुमाळ, गणेश नर (श्रवन्श ज्वेलर्स) यांचे सहकार्य लाभले सुधाकर चौकेकर आणि तुकाराम चौकेकर यांनी हे नाटक यशस्वीरीत्या पार पाडण्यासाठी विशेष योगदान दिले. तर रंगमंच व्यवस्था श्री वेलकेश्वर सेवा मंडळ (काझरवाडी) यांनी सांभाळली. आज संपूर्ण कोकण पट्टी मध्ये या नाटकाचा आणि नाटकातील कलावंतांचा गौरव केला जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here