अहमदनगर : (सुनिल नजन/अहमदनगर) संपूर्ण महाराष्ट्रात नवरात्रात आई तुळजाभवानी मंदिरे भाविकांच्या प्रचंड गर्दीने सर्व मंदिरे फुलुन गेलेली असतानाच अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील कासारपिंपळगाव, जवखेडे, कोपरे परिसरातील तुळजाभवानी मंदिरात ही भाविकांची प्रचंड गर्दी झाल्याचे दिसून येत आहे. तिन्ही गावातील तुळजाभवानी मंदिराचे काम प्रगतीपथावर आहे. जवखेडे येथील आंधळे वस्तीवरील डागातील देवी म्हणून प्रसिद्ध असलेल्या तुळजाभवानी मंदिरात दररोज विविध कार्यक्रम पार पडत आहेत. किर्तन, भजन,गोंधळ, जागर,पंचारती असे विविध कार्यक्रम आंधळे परिवाराच्या वतीने पार पडत आहे. दर पौर्णिमेला महाप्रसादाचेही आयोजन करण्यात येते. कोपरे येथे ही मळगंगा मंदिरात विविध कार्यक्रम साजरे होत आहेत. मंदिराचे नवीन बांधकाम पुर्णत्वास गेले आहे. तसेच आव्हाड वस्तीवरील तुळजाभवानी, सह येडेश्वरी मंदिराचे बांधकाम पुर्ण झाले आहे.आव्हाड परीवारा तर्फे उत्कृष्ट प्रकारे सेवा केली जात आहे.कासार पिंपळगाव येथे म्हस्के परिवाराच्या वतीने शेषनारायण म्हस्के, बाळासाहेब म्हस्के,, शिवाजी म्हस्के उत्सव दरवर्षी साजरा करतात.एकंदरीत नवरात्र महोत्सवात पंचक्रोशीतील तुळजाभवानी मंदिरे भाविकांच्या गर्दीने फुलून गेली आहेत.
Home Breaking News कासार पिंपळगाव,जवखेडे, कोपरे पंचक्रोशीत आई तुळजाभवानी मंदिरात नवरात्र महोत्सवात महीलांची गर्दी!








