अहमदनगर : (सुनिल नजन/अहमदनगर) पुणे जिल्ह्यातील पाटेठाण येथील विश्वव्यापी मानवधर्म आश्रमाचे अध्यक्ष महंत सुमंतबापू हंबिर यांच्या हस्ते राहुरी येथील सरोदे वस्तीवर गायत्री महायज्ञ प्रज्वलीत करून गायत्री मंत्राने सुरुवात करण्यात आली. या यज्ञासाठी सौ छाया खिलारी आणि सखाराम खिलारी यांच्या तर्फे नियोजन करण्यात आले होते. अनेक जिल्ह्यातील अनेक शिष्यगण येथे उपस्थित होते. सुमंतबापू हंबिर यांनी अनेक नवीन शिष्यांना अनुग्रह दिला. महाप्रसादाने या सोहळ्याची सांगता झाली. धनगर समाजाचे युवा नेते भारत मतकर,ताराचंद तमनर,अनिल गीते, कैलास हरगुडे,आबा सातव,राजूकाका हंबिर, नंदू कनसे,अमित शहाणे, संतोष जगधने,सचिन तमनर,लक्ष्मण मैड,दत्तात्रय तमनर,माउली बोरुडे,रामचंद्र मतकर, सुमित खिलारी, प्रणित खिलारी ,विवेक पंडीत,हे आवर्जून उपस्थित होते. महीलांची उपस्थिती मोठ्या संख्येने होती. महंत सुमंतबापू हंबीर यांच्या प्रवचनाने उपस्थित श्रोते मंत्रमुग्ध झाले.








